Narendra Modi
Narendra Modi  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narendra Modi News : नगरच्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना भेट म्हणून पाठवले कांदे; सोबतच केली 'ही' मागणी

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar farmers sent onions to PM Narendra Modi : कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्यानं शेतकरी वर्ग चांगलाच आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले असून आंदोलनं सुरु आहेत. याचवेळी अहमदनगर येथील शेतकऱ्यांनी सरकारने कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण बदलावे ही मागणी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पोस्टामार्फत कांदे भेट म्हणून पाठवले आहेत.

अहमदनगरच्या बाजारपेठेत एका शेतकऱ्याच्या कांद्या(Onion) ला दोन रुपये किलोचा भाव मिळाला होता. १७ गोण्या कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती केवळ एक रुपया पडला. बीडच्या आष्टी तालुक्यातील बावी येथील शेतकऱ्याच्या बाबतीत घडले आहे. नामदेव लटपटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

सोलापूर बाजार समितीमध्ये १० पोती कांद्यांची विक्री केल्यावर शेतकऱ्याला फक्त दोन रुपये मिळाले. ते पैसेही चेक स्वरुपात देण्यात आले. यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पादन बाजार समितीतही वारंवार कांदा खरेदी दरामध्ये घसरण होताना पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनातही घसरलेल्या कांदा दराचे तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डोक्यावर कांदे घेऊन पोहोचले होते. नेत्यांच्या डोक्यावर टोपली होती, त्या टोपलीत कांदे होते. आमदारांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यां(Farmers)ना कांद्याचे योग्य ते दर देण्याची मागणी केली होती

नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होत आहे हा विश्वास निर्माण करण्यात सरकारला अपयश आलं आहे. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात सापडलेला असल्याने ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, आंदोलन करत आहेत. त्यामुळे नाफेडसह केंद्र आणि राज्य सरकारविरोधात निषेध केला जात आहे. त्याचबरोबर कांद्याला हमीभाव द्या आणि नुकसान भरुन काढण्यासाठी अनुदान द्या ही मागणी केली जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाच्या वतीनं मोदी सरकारनं कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण बदलावे ही मागणी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टामार्फत कांदे भेट म्हणून पाठवले आहेत. यावेळी गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी गांधीगिरी केली आहे. सोबतच जर शासनाला कांद्याला भाव देता येत नसेल ते शेतकऱ्यांना रोटाव्हेटर घेण्यासाठी अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT