PM Modi and Prajakt Tanpure  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLA Prajakt Tanpure : महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या वाढली ? आमदार तनपुरेंनी थेट पंतप्रधानांकडे केली 'ही' विनंती !

Pradeep Pendhare

Ahmednagar News: माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली. नगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देखील बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर चर्चा झाली. परंतु त्यावर फक्त चर्चाच झाली.

केंद्र सरकारमध्ये नगर जिल्ह्यातील दोन खासदार आहेत. त्यांनी या समस्येकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधावे, नुसती चर्चा ही देखील पंतप्रधानांना विनंती आहे. बिबट्यांची संख्या कमी झाल्यानंतर मग चित्ते, नाहीतर काय आणायचे ते आणा, अशी टिप्पणी आमदार तनपुरे यांनी केली.

नगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येकडे लक्ष वेधले. ही समस्या गंभीर होत चालली आहे. यात केंद्र सरकारने लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी आमदार तनपुरे यांनी केली.

महाराष्ट्रात बिबट्याच्या वाढत्या संख्या ही किती गंभीर समस्या आहे हे, नाशिकमधील प्रकारावरून लक्षात येते. नाशिकमधील सावतानगर आणि गोविंदनगरमध्ये एका पाठोपाठ दोन बिबट्यांचा वावर आढळूला आला. सावतानगरमधील बिबट्याला बंदी केल्यानंतर गोविंदनगरमध्ये दुसरा बिबट्या घरात आढळला.

बिबट्यांच्या या वावरामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. नगर जिल्ह्यात देखील बिबट्यांची संख्या वाढली. शेतकऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार बिबट्याकडून होत आहेत. थंडीच्या दिवसात बिबट्यांचा वावर आणखी वाढू शकतो. यावर नगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली.

आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नगरसह महाराष्ट्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या घरापासून बिबट्या गेल्याचा उल्लेख बैठकीत केला. केंद्र सरकारमध्ये या विषयावर फक्त चर्चा होते.

केंद्र सरकार दुसऱ्या देशातून चित्ते आणत आहेत. परंतु महाराष्ट्रात बिबटे माणसे मारत आहेत. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी शेतात जाता येत नाही. केंद्र सरकारने बाहेरच्या देशातून चित्ते आणण्यापेक्षा कायद्यात शिथिलता करून संख्येने वाढत्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आमदार तनपुरे यांनी केली.

आमदार तनपुरे पुढे म्हणाले, "बिबट्यांची प्रजनन क्षमता रोखण्यासाठी बिबट्यांची नसबंदी करता येईल का, यावर उपाययोजन होणे गरजेचे आहे. वाघांची संख्या कमी झाली म्हणून त्यांना सुरक्षा दिली जाते. येथे बिबट्यांच्या हल्ल्यात माणसे मरायला लागली आहेत, त्याचे काय? शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही. त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करून बिबट्यांची संख्या रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे".

"नगर जिल्ह्यातील दोन्ही खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यांनी केंद्रात हा मुद्दा लावून धरला पाहिजे. त्यावर ठोस उपाययोजन करून घेऊन महाराष्ट्राला बिबट्यांच्या उपद्रवापासून वाचवले पाहिजे. नुसती चर्चा कोण, ही पंतप्रधानांना विनंती आहे. बिबट्यांची संख्या कमी झाल्यानंतर मग चित्ते आणायचे किंवा इतर काय आणायचे ते आणा", असे आमदार तनपुरे यांनी म्हटले.

Edited by Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT