Ahmednagar Grampanchayat Elections 2023  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nagar: धक्कादायक: मतदान केंद्रावरच एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Ahmednagar Grampanchayat Elections 2023 : त्यांनी मतदान केले, पण मतदान कक्षाच्याबाहेर पडताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला

Mangesh Mahale

Ahmednagar: ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानास वेग येत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहमदनगरच्या करंजीमध्ये मतदानानंतर हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मतदान करण्यासाठी सुनील गांधी हे मतदान केंद्रात पोहाेचले. त्यांनी मतदान केले, पण मतदान कक्षाच्याबाहेर पडताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. गांधी यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. गांधी हे काही दिवसांपासून आजारी होते.

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात एकूण सोळा ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान पार पडत आहे. या निवडणुकींची तालुक्यात रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान, धारगाव या ग्रामपंचायतीत निवडणुकीत उभ्या असलेल्या एका महिलेच्या पतीला हाणामारी झाली. यामध्ये उमेदवार महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. याबाबत आता जवळच्या घोटी पोलिस स्थानक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर या प्रकरणाशी संबंधित इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

कोल्हापुरात चिंचवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत याचा प्रत्यय यंदाही आला. टोकाच्या संघर्षामुळे मतदान केंद्राच्या खोलीतचं उमेदवार प्रतिनिधी एकमेकांना भिडले. पोलिसांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी बाचाबाची शूट करण्यास विरोध केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकमेकांना अपशब्द वापरत शिव्यांच्या लाखोली पोलिसांच्या समोरच वाहिल्या जात असल्याचा प्रकार घडला. मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने हा प्रकार चिघळला. करवीर तालुक्यातील चिंचवाड या ग्रामपंचायतीत निवडणुकीत आज उमेदवार प्रतिनिधींमध्येच राडा झाल्याचा प्रकार घडला. मतदान केंद्रातील खोलीमध्येच उमेदवार प्रतिनिधींची राजकीय ईर्षा त्याला कारणीभूत ठरले.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरमधील नागदेववाडी येथील प्रभाग क्रमांक २ मधील अपात्र झालेल्या सदस्याच्या रिक्त एका जागेसाठी आज (रविवारी) निवडणूक होणार होती, पण उच्च न्यायालयाने पुणे आयुक्तांचा पात्र-अपात्रेचा अंतिम निकाल येईपर्यंत या पोटनिवडणुकीला स्थगिती दिली. निवडणूक लावल्याने उमेदवारांसह ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागला असून, निवडणूक अधिकारी ग्रामसेविका अश्विनी पाटील यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT