Nilesh Lanka party worker sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke News : नीलेश लंकेंच्या पदाधिकाऱ्यांचे 'ईव्हीएम'वर लक्ष, गोदामाभोवती ठोकला तळ

Pradeep Pendhare

Ahmednagar Lok Sabha News ः नगर लोकसभा निवडणुकी झाली असली तरी चार जून पर्यंत दोन्ही उमेदवारांना निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. भाजप उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे दोघेही आपल्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र, मतदानानंतर नीलेश लंके यांच्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी ईव्हीएम ठेवलेल्या एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामाभोवती तळ ठोकून आहेत. ईव्हीएम EVM खुले होईपर्यंत येथेच पदाधिकाऱ्यांचा पहारा असणार आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील Ahmednagar Lok Sabha 13 मे रोजी मतदान झाले. या दिवशी नगर दक्षिणमध्ये तणाव होता. महायुती भाजप आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांना काही ठिकाणी भिडले होते. नगर दक्षिण मतदारसंघात मतदान संवेदनशील पातळीवर झाले. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंकेंचा Nilesh Lanke यांच्या नीलेश लंके प्रतिष्ठानचे 15 पदाधिकारी मतदान झालेले ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही स्ट्राँग रूममध्ये तळ ठोकून आहेत.

हे पदाधिकारी तीन शिफ्टमध्ये पाच-पाचच्या संख्येने स्ट्राँग रूममधील सीसीटीव्ही समोर बसून असतात. सीसीटीव्हीमधील हाचलाचींवर टिपतात. नगर जिल्हा प्रशासनाने एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये मतदानानंतर मतदान झालेले ईव्हीएम सील करून ठेवल्या आहेत. नगर दक्षिण आणि शिर्डी मतदारसंघात मतपेट्या ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन गोदामांची सोय केली आहे. या दोन्ही गोदामांभोवती जिल्हा प्रशासनाने बंदुकधारी पोलिसांचा बंदोबस्त उभा केला असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांखाली संपूर्ण गोदाम आणि परिसर आणला आहे.

गोदामाभोवती पोलिस बंदोबस्त

ईव्हीएमच्या गोदामाभोवती खडा पोलिस बंदोबस्त असला तरी नीलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सीसीटीव्ही स्ट्राँग रूममध्ये डोळ्यात तेल घालून हालचालींवर लक्ष देत आहेत. हे पदाधिकारी माजी आमदार नीलेश लंकेंना दिवसभराचे रिपोर्टींग करतात. या पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून ओळखपत्र देखील देण्यात आली आहेत. हीच पदाधिकारी सीसीटीव्ही रूममध्ये येऊ शकतात. ओळखपत्रांशिवाय अन्य कोणाला येथे परवानगी दिली जात नाही.

सीसीटीव्हीवर लक्ष

उमेदवाराने दिलेल्या प्रतिनिधींनी ओळखपत्रांनुसार प्रशासकीय यंत्रणेकडून चौकशी करून सीसीटीव्ही स्ट्राँग रूमकडे सोडले जाते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराला आपआपली माणसे सीसीटीव्ही रूममध्ये येऊन पूर्णवेळ राहण्याची परवानगी दिली आहे. परंतु नीलेश लंके यांच्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी सोडून अन्य कोणत्याही उमेदवारांचे प्रतिनिधी येथे पूर्णवेळ दिसत नाहीत. भाजप Bjp उमेदवारांचे पदाधिकारी दिवसभरातून अधून-मधून येऊन आढावा घेतात. तसेच, जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी देखील सीसीटीव्ही रूममधील हालचालींचा आढावा घेतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT