Shirdi News: अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Constituency 2024) भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांची नाराजी दूर करण्यात खासदार सुजय विखे पाटलांना (Sujay Vikhe Patil) यश आले आहे. तर दुसरीकडे शिर्डी मतदारसंघात मात्र विखे आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) या एकाच पक्षात असणाऱ्या राजकीय विरोधकांचे सुत मात्र जुळत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कोल्हेंची नाराजी कशी दूर करायची हे विखेंसमोर आवाहन आहे.
शनिवारी सायंकाळी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी कोपरगाव शहरात मेळावा झाला. मेळाव्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. भाजपच्या माजी आमदार स्नेहालता काळे आणि त्यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवली.
एकाच पक्षात असून गेल्या काही महिन्यांपासून कोल्हे आणि विखे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यामुळेच कोल्हे यांनी विखे पाटलांसोबत एकाच मंचावर येण्याचे टाळले असल्याचे बोलले जाते. महायुतीच्या या मेळाव्यात विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे तरुण आमदार असा उल्लेख करत कौतुक केले. नगर दक्षिणच्या जागेवरून विखे पाटलांनी आघाडीचे उमेदवार नीलेश लंकेंना टोला लगावला.
सुजय विखेंनी यावेळी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली."मतांसाठी किती लाचार व्हावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा आहे. अनेक वर्षे सत्तेत राहूनही काँग्रेसला शहाणपण येत नाही. काँग्रेसची बौद्धिक दिवाळखोरी संपलेली नाही. जनतेला काय हवं याचं त्यांना भान नाही. इतके वर्षे सत्तेत राहून ते जनतेला न्याय देऊ शकले नाही. दुर्दैवाने काँग्रेसचा जाहीरनामा कुणी वाचत नाही," असा टोला त्यांनी लगावला.
"काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मतदार भुलणार नाही. ज्या लोकांना स्वतःचे पक्ष सांभाळता येत नाही त्यांनी आता आघाडी काढली.आघाडीचा नेता ठरत नाही. नरेंद्र मोदी हे आपले नेते ठरलेले आहेत. आपल्याला मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. आपला आवाज दिल्ली आणि बारामतीपर्यंत गेला पाहिजे," असे विखे म्हणाले.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.