Rohit Pawar Nilesh Lanke sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Lok Sabha Constituency : 'का रे हा दुरावा...' नीलेश लंकेंबाबत रोहित पवारांच्या मनात काय?

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election 2024 : अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून नीलेश लंके मैदानात आहेत. सुजय विखेच्या पुढे लंकेंनी आव्हान उभे केले आहे. उमेदवारीसाठी लंकेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत 'तुतारी' हातात घेतली. त्यांच्या या प्रवासात जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे (शरद पवार) सगळे नेते लंकेंसोबत दिसले. मात्र, रोहित पवार मात्र लंकेंपासून अंतर राखून असल्याची चर्चा आहे.

आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी नीलेश लंके (Nilesh Lanke) कार्यकर्ते घेऊन पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी शरद पवारांच्या हस्ते लंकेंच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या आधी पत्रकार परिषददेखील झाली. मात्र, या कार्यक्रमाला रोहित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे रोहित पवार (Rohit Pawar) कुठे आहेत, याची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लंकेंनी आमदारकीचा राजीनामा देत अजित पवारांची साथ सोडली. शरद पवार यांच्यासोबत येण्याचा निर्णय जाहीर करत पक्षप्रवेश करत हाती घेतली. त्यावेळीदेखील रोहित पवार यांची म्हणावी तशी प्रतिक्रिया समोर आली नाही. त्यामुळे नीलेश लंके रोहित पवारांमध्ये आलबेल आहे की नाही, याच्या चर्चा सुरू झाल्या.

...म्हणून दुरावा?

कर्जतमध्ये राम शिंदे हे रोहित पवारांचे विरोधक आहेत. त्यांना पराभूत करत रोहित पवारांनी विधानसभा जिंकली. राम शिंदे यांना भाजपकडून विधान परिषदेवर घेतले. राम शिंदे विधान परिषेदवर आल्यानंतर त्यांच्यात आणि नीलेश लंकेंमध्ये जवळीक वाढल्याच्या चर्चा आहेत. लंके यांच्या अनेक कार्यक्रमांना राम शिंदेंनी हजेरी लावलेली आहे. त्यामुळेच रोहित पवार हे लंकेंवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

(Edited By Roshan More)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT