Dr. Subhash Bhamre & Faruk Shah
Dr. Subhash Bhamre & Faruk Shah Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

AIMIM; फारूक शाह यांनी भाजपच्या खासदार भामरेंना दिले खुले आव्हान!

Sampat Devgire

धुळे : शहराच्या (Dhule) विकासासाठी गेल्या तीन वर्षांपासून मी जो निधी आणला, त्याप्रमाणे खासदारांनी (MP Subhash Bhamre) केंद्रातून (Centre Government) शहर विकासासाठी किती निधी आणला? तसेच मी कधीच जातीपातीचे राजकारण करीत नाही. सर्व समाजाला सोबत घेत विकासाची (Devolopment) कामे करीत आहे, अशी माहिती आमदार फारुक शाह (AIMIM Faruk Shah) यांनी दिली. ( I am becaming powerfull in Politics claim Faruk Shah)

धुळे शहरासाठी राज्य शासनाने दिलेल्या तीस कोटींच्या निधीवरून गेले काही दिवस भाजप आणि `एमआयएम`चे आमदार फारूक शाह यांच्यात गेले काही दिवस राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शाह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले, वर्षभरापूर्वी जी ३० कोटींची कामे मी मंजूर करून आणली, त्या कामांचे श्रेय घेण्यासाठी खटाटोप सुरू आहे. असे असताना शहर विकासासाठी शंभर कोटींवर निधी महापालिकेला प्राप्त करून दिल्याची

ते म्हणाले, माझी कामे शहरात वरचढ ठरत असल्याने भगीरथ जोडी त्या कामांना स्थगिती देऊन नव्याने आम्ही कामे कशी मंजूर करून घेतली, यासाठी स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे.

सत्ताधाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे व भगीरथ जोडीमुळे विकास कामांना अडथळा निर्माण होत आहे. आमदार म्हणून भेदभाव न करता भाजपच्या नगरसेवकांसाठी कोट्यवधींचा निधी प्रभाग विकासासाठी दिला आहे. मी दिलेला निधी व खासदारांनी दिलेला निधी याची तुलना शहरवासीयांनी करावी.

खासदारांनी शहर विकासासाठी राज्य शासनाकडून निधी खेचून आणून दाखवावा. खासदारांनी नऊ वर्षांपासून रेल्वेचे गाजर दाखविले. परंतु, माहितीप्रमाणे आजपर्यंत रेल्वे मार्गाचे काम झालेले नाही. अक्कलपाडा योजनेचे पाणी दिवाळी उलटूनही शहरात पोचलेले नाही. महापालिकेने सहकार्य केल्यास आमदार म्हणून दोनशे कोटींचा निधी शासनाकडून आणू शकतो, असे श्री. शाह म्हणाले. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष नासीर पठाण उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT