Hemant Godse
Hemant Godse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

विमानसेवा गुजरातने पळवली?; खासदार काही बोलेना!

Sampat Devgire

नाशिक : विविध प्रकल्प गुजरातला (Gujrat) पळविले जात असल्याचे आरोप होत आहेत. याबाबत जनतेत प्रचंड अस्वस्थता (Nashik people disturbed) आहे. ते थांबण्याची चिन्हे नसुन आता नाशिकला (Nashik) विमानसेवा बंद (Air service closed) करून ती देखील गुजरातला गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे नाशिकचे खासदार, केंद्रीय मंत्री केवळ पत्रप्रपंच करण्यापुरतेच राहिले आहेत. शासनाला पत्र द्यायचे व त्याची प्रसिद्धी करायचे एव्हढेच खासदारांचे काम आहे काय?. (Nashik air connectivity may closed due to shifting Gujrat)

नाशिकला विमानसेवा देणारी अलायन्स एयर लाईन्स ही विमान कंपनी केंद्राच्या उडान प्रकल्पा अंतर्गत नाशिकमध्ये काम करत होती. उडानची स्कीम संपली मात्र कंपनीला चांगला फायदा होत होता. नाशिक आणि आजूबाजूच्या शहरांचे लोक या सेवेचा फायदा घेत होते. मात्र तरी या कंपनीला गुजरात मध्ये जाण्यास भाग पडले असा दावा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. हे सत्य असेल तर सत्ताधारी भाजपची आणि सत्ताधारी खासदारांची यावर काय भूमिका असेल, याला नाशिककरांच्या दृष्टीने खुप महत्व आहे.

गेले काही महिने सातत्याने नागरिकांकडून विमानसेवेबाबत दक्ष राहण्याच्या सुचना केल्या जात होत्या. नाशिककरांची ती भिती आता खरी ठरली आहे. लोकप्रतिनिधी काहीही दावा करीत असले तरी विमानसेवा शेवटच्या घटका मोजत आहेत. उडान योजना बंद पडल्यावर शेजारच्या जळगावचे सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. विमानसेवा सुरु रहावी यासाठी त्यांनी किमान हालचाल तरी केली. नाशिकला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा. भारती पवार, हेमंत गोडसे आणि सुभाष भामरे हे तिन्ही केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. ते विमानसेवाही वाचवू शकत नसतील तर ते सत्तेत असल्याचा जनतेला काय उपयोग, अशी संतप्त भावना आहे.

नाशिक विमानतळ दुरुस्तीसाठी बंद राहणार, अलायन्स कंपनीने सेवा बंद केली यामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न पत्रकार परिषदेद्वारे झाला. पण उडान योजना संपल्यानंतर संबंधित कंपनीला सेवा देणे परवडत नसल्यास काय मार्ग काढणार याबाबत स्पष्ट उत्तर नाही. विमान उड्डाण मंत्रालय याबाबत धोरणात्मक निर्णय केव्हा घेईल, याची सर्वांना प्रतिक्षा आहे.

नाशिक(ओझर) विमानतळ येथून स्पाइसजेट व अलायन्स या दोन विमान कंपन्या पुणे, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, पुद्दुचेरी, तिरुपती या ठिकाणी विमासेवा पुरवतात. सध्या स्पाइस जेट विमानसेवा सुरू असून एअर अलायन्सने सेवा बंद केली आहे. अलायन्स कंपनीची उडान योजनेची तीन वर्षांची मुदत संपल्यानंतर सेवा परवडत नसल्याचे कारण दिले आहे. मात्र, यामुळे नाशिकच्या विमानसेवेवर परिणाम होऊन व्यावसायिक, उद्योजक यांची गैरसोय होत आहे.

पत्र बहाद्दर खासदार!

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आहेत. ते शिवसेनेचे होते. मात्र त्यांनी बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. विकासासाठी आपण बंडखोरी केल्याचे ते सांगतात. मग विमानसेवा विकासाचा भाग नाही का? असा प्रश्न पडतो.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT