Jalgaon : जळगाव जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिना मोठ्या राजकीय घडामोडींचा ठरत असून, चांगलाच चर्चेत आला आहे. या महिन्यात जळगावमध्ये राजकीय नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ५ सप्टेंबरला सभा झाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची १० सप्टेंबरला सभा झाली.
या दोन्ही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता महायुती सरकारच्या 'शासन आपल्या दारी' हा कार्यक्रम पाचोरा येथे पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं विधान केलं आहे.
तीन वेळा निश्चित होऊनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या कार्यव्यस्ततेमुळे पुढे ढकललेला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील ' शासन आपल्या दारी' अखेर मंगळवारी (ता. १२) पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आलेला आहे. यावर सर्वपक्षीय बैठक झाली. राज्य कारभार करत असताना, सगळ्यांना विश्वासात घेऊन मार्ग काढायचा असतो. सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला आहे, असेही ते म्हणाले.
''...त्यांचा संबंध नसताना माफी मागितली!''
अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले, कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता, आपल्याला मार्ग काढायचा आहे. कुणीही लाठीचार्ज घटनेचे समर्थन करणार नाही. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी त्यांचा संबंध नसताना माफी मागितली. तिथे अधिकाऱ्यांची चुकी होती, असेही त्यांनी सांगितले.
'' मोदी विकासाचे व्हिजन असणारे नेते...''
पाचोरा येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी त्यांनी मोदीसाहेब विकासाचे व्हिजन असणारे नेते आहे. केंद्र सरकारच्या मदतीने विकासाची गाडी भरधाव वेगाने जाण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. जळगाव जिल्ह्याचा चांद्रयान ३ मध्ये महत्त्वाचा वाटा आहे. भारताचे सूर्ययान देखील झेपावले असल्याचे कौतुकोद्गार काढले.
जळगाव जिल्हा सुवर्णनगरी म्हणून ओळखला जाणारा आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील जळगावच्या आहे. ना. धो. महानोर, अझीझ प्रेमजी देखील जळगावचे आहे. पण आज जळगाव जिल्ह्यात आणखी पावसाची गरज आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी दोन चार दिवसांत बरा पाऊस झाल्याने चांगली परिस्थिती दिसत आहे. मात्र, सगळीकडे अशी परिस्थिती नाही. जरूर काही ठिकाणी पाऊस दुरावला आहे. आमच्या महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा उतरविण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.