Ajit Pawar asthi visarjan :  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar death : स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिंचे नाशिकच्या रामकुंडात विसर्जन

Ajit Pawar asthi visarjan : मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईहुन नाशिक जिल्ह्यात हेलिकॉप्टरने अजितदादांचे अस्थिकलश आणले. येवल्यात व नाशिकमध्ये शोकसभा झाली. त्यानंतर रामकुंडात अस्थिंचे विसर्जन करण्यात आले.

Ganesh Sonawane

Ajit Pawar death : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या अस्थींचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह स्थानिक नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिकच्या रामकुंडावर विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे नुकतेच बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांचे अस्थिकलश आज नाशिक येथे आणले. आज नाशिक येथे श्रद्धांजली वाहिल्यानंतर रामकुंडावर अस्थींचे विधिवत पूजन करत विसर्जन करण्यात आले.

यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे शरद आहेर, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, आनंद सोनवणे, सीमंतिनी कोकाटे, समाधान जेजुरकर, शंकर मोकळ, आशा भंदूरे, सुरेखा निमसे, ज्ञानेश्वर गायकवाड, तानाजी गायधनी, नरेश पाटील यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

येवल्यात शोकसभा

आज सोमवार (दि. २) मुंबईतून हेलिकॉफ्टरने येवल्यात मंत्री भुजबळ हे स्व. अजितदादांचे अस्थिकलश घेऊन आले. स्व.अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी माऊली लॉन्स येवला येथे शोकसभा पार पडली. यावेळी मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी सोबत आणलेला अस्थिकलश अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. येवल्यातील सर्वसामन्य नागरिक व सर्वपक्षीय नेत्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले.

नाशिकमध्ये शोकसभा

त्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे नाशिक शहरात अस्थिकलश घेऊन आले. नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे शोकसभा झाली. या सभेत नाशिकमधील सर्वपक्षीय नेत्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे, भाजप आमदार देवयानी फरांदे, मनसेचे नेते सुदाम कोंबडे, कॉंग्रेसचे नेते आकाश छाजेड यांच्यासह अनेक विविध पक्षाच्या नेत्यांनी दादांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. उपस्थितीत प्रत्येकजण भावूक झाला. शोकसभेनंतर रामकुंड येथे दादांच्या अस्थिंचे विसर्जन करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT