rohit pawar ajit pawar sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Vs Rohit Pawar : अजितदादांच्या शिलेदाराने सांगितले, रोहितदादांना घेरणारच...

Nilesh Lanke Join Sharad Pawar Party : नीलेश लंके शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चेवरही अजित पवारांच्या शिलेदारानं स्पष्टीकरण दिलं आहे.

Pradeep Pendhare

अहमदनगर : 13 मार्च | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्याकडून तयारी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ( Lok Sabha Election 2024 ) येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात अजित पवार स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी करत आहेत. तशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील ( Umesh Patil ) यांनी दिली.

जामखेड येथील रत्नदीपचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्याविरोधात त्यांच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मोरेंविरोधात मुलीच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच, पसार झाला आहेत. मोरे यांना अटक होईपर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. आंदोलन सुरू असल्याने जामखेडमधील सामाजिक तसेच राजकीय संघटनांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आमदार रोहित पवार यांनीदेखील विद्यार्थ्यांची भेट घेऊन आंदोलनात सहभागी झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीदेखील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी जामखेडमध्ये पत्रकार परिषद घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेश पाटील म्हणाले, "कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. या मतदारसंघावर अजितदादांचे ( Ajit Pawar ) विशेष लक्ष आहे. अजितदादांनी या मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे मंजूर करून ती मार्गी लावली आहेत. या मतदारसंघात विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रबळ उमेदवार देणार आहे. हा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी अजितदादा घेणार आहेत."

"आमदार लंके अजितदादांबरोबरच राहणार"

आमदार नीलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. आमदार लंके शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून लोकसभेचे उमेदवार असतील, असे म्हटलं जात आहे. यावर उमेश पाटलांनी म्हटलं, "या फक्त चर्चा आहेत. शरद पवार यांनी स्वतः त्यांच्या प्रवेशाचे वृत्त फेटाळले आहे. आमदार लंके हे अजितदादांचे खंदे समर्थक आहेत. ते अजितदादांना कधीच सोडणार नाहीत. ते अजितदादांबरोबरच राहतील, असा दावा केला".

मोरे प्रकरणाची गंभीर दखल

जामखेडमधील रत्नदीप फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरेंनी केलेल्या गुन्ह्याची गंभीर दखल महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी घेतली आहे. या सर्व प्रकारावर रूपाली चाकणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांचे निवेदनदेखील तपासले आहे. विद्यार्थ्यांबरोबर मोरेंनी केलेले कृत्य हे गंभीर स्वरूपाचे आहे. या सर्व प्रकारावर पोलिसांनी गांभीर्याने तपास करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. तसेच, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने याची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना आयोगाने केल्या आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT