Anil Patil highlights increasing crime and security concerns in Amalner during the Assembly session and demands a separate police station for better law enforcement. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anil Patil Politics: 'माझ्या मतदारसंघात काहीच सुरक्षित नाही..!'; सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचं विधानसभेत धक्कादायक विधान,केली 'ही' मोठी मागणी

Jalgaon NCP Anil Patil : अमळनेर मतदारसंघात वाढती गुन्हेगारी, चोरी आणि टोळीवादामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे आमदार अनिल पाटील यांनी विधानसभेत मांडत स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी केली.

Sampat Devgire

Anil Patil News : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांनी मागण्यांचा पाऊस पडला आहे. मागण्यांच्या समर्थनासाठी सातत्याने अडचणी मांडण्यात येत आहेत. यात सत्ताधारी पक्षाचे आमदार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी मंत्री आणि आमदार अनिल पाटील यांनी आपल्या मतदारसंघाची विदारक स्थिती मांडली. अमळनेर या मतदार संघात अनेक अडचणी असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी त्यांनी उदाहरण देखील सादर केले.

मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघात शासन आणि तातडीने लक्ष घालावे. मतदारसंघाच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करावे ही त्यांची मागणी होती.

अमळनेर शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मारामाऱ्या आणि टोळ्यांकडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. मतदार संघातील गुंडगिरी वाढत असून गोळीबाराच्या घटना नियमितपणे उघड होत आहेत. गुन्हेगारांकडे अवैध शस्त्र आढळतात. त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.

अमळनेर मतदारसंघात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे अगदी शेतकऱ्यांच्या बांधावर आणि शेतातही चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत. विज मंडळाच्या तारा देखील सुरक्षित राहिलेल्या नाहीत. विजेच्या तारा चोरण्याचे प्रकार घडत आहेत.

आपल्या मतदारसंघातील ही स्थिती बदलण्याची गरज आहे. नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर तातडीने सरकारने या मतदारसंघासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करावे, अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीका विरोधकांनी या अधिवेशनात केली. शासनावर विरोधकांकडून अशी टीका होणे स्वाभाविक आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागण्यांना मंजुरी मिळावी म्हणून सत्ताधारी पक्ष ही कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत नसल्याची माहिती देत असल्याने तो चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT