Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : अजित पवार गटाची मंगल कलश यात्रा उद्या नाशिकमध्ये, 'या' ठिकाणांची माती करणार अर्पण

Ajit Pawar NCP Mangal Kalash Yatra : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्तावाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात मंगल कलश यात्रा हा उपक्रम सुरु केला आहे. उद्या नाशिक जिल्ह्यात यात्रेचे आगमन होणार आहे.

Ganesh Sonawane

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्तावाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात मंगल कलश यात्रा हा उपक्रम सुरु केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सहा विभागीय महाराष्ट्र गौरव रथ: मंगल कलश यात्रा काढल्या जात आहेत. त्या मुंबईतील जांबोरी मैदानावर महाराष्ट्र दिनी १ मे'ला एकत्रित येणार आहेत. १ मे पासून ४ मे पर्यंत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी पक्षाची मंगल कलश यात्रा उद्या (दि.२९) नाशिक जिल्ह्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी दिली आहे. उत्तर महाराष्ट्रातील ही यात्रा मंगळवारी जळगाव, नंदुरबार, धुळेमार्गे नाशिक जिल्ह्यात येणार आहे. नाशिक - धुळे हद्दीवरील झोडगे येथे सकाळी 9 वाजता या मंगल कलश यात्रेचे पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. येथील अतिप्राचीन हेमाडपंथी माणकेश्वर महादेव मंदिरास भेट देऊन तेथील मातीचे कलशात अर्पण करण्यात येणार आहे.

मालेगाव तालुक्यात चंदनपुरी येथील खंडोबा महाराज मंदिरास भेट दिली जाणार आहे, तेथील भंडाऱ्याचे कलशात अर्पण केले जाईल. त्यानंतर गिरणा नदी व मोसम नदी यांच्या संगमास भेट देऊन जलपूजन केले जाणार आहे. साडेतीन पीठांपैक आद्य शक्तीपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवी मंदिरातून आणलेल्या मातीचे मंगल कलशात अर्पण केले जाणार आहे.

तसेच त्यापुढे नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील शनि महाराज मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बागलाण तालुक्यातील किल्ले साल्हेर, किल्ले मुल्हेर येथून आणलेली पवित्र माती, देवळा येथील किल्ले धोडप, चांदवड येथील रेणुका देवी मंदिर, येवला येथील मुक्तीभूमी, दिंडोरी तालुक्यातील किल्ले रामशेज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहालाच्या मातीचे कलशात विधीपूर्वक अर्पण करण्यात येणार आहे.

सुरगाणा तालुक्यातील सात नंद्याच्या संगमावरील पवित्र मातीचे पूजन करुन तेथील जलही मंगल कलशात टाकण्यात येणार आहे. पेठ येथील हुतात्मा देवाजी राऊत यांच्या स्मारकातील मातीही कलशात अर्पण करण्यात येणार आहे. ओझर येथील एच.ए.एल. कारखान्याला भेट देऊन तिथे कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता नाशिक शहरात कार्यक्रम होईल. ३० एप्रिल ला महाराष्ट्र रथ: मंगल कलश यात्रा अहिल्यानगर जिल्ह्याकडे प्रयाण करेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT