Ajit Pawar, NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics: अजितदादांना CM पदाचे डोहाळे? द्राक्ष बागायतदारांना म्हणाले, वर्षभरात चमत्कार होणार!

Ajit Pawar politics, Activists are confused about Ajit Pawar's election strategy, NCP Drive starts From Nashik-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जन सन्मान यात्रा सुरू केली आहे.

Sampat Devgire

Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने विधानसभा निवडणुकीचा प्रचार दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून गुरूवारी सुरू केला. उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत नाशिक येथून जन सन्मान यात्रेत लाडकी बहिण योजनेवर विशेष भर दिसला.

विधानसभेच्या निवडणुक प्रचाराच्या प्रारंभीच अजित पवार यांचा पक्ष गोंधळलेला दिसला. अजित पवार यांच्या मेळाव्याच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते श्रीराम शेटे यांचे मोठे कट आउट लावण्यात आले होते. प्रत्यक्षात श्री शेटे त्या मेळाव्याकडे फिरकलेही नाही.

कादवा साखर कारखान्यावर लावलेल्या स्वागताच्या फलकावर देखील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि श्रीराम शेटे यांचे फोटो होते. त्यामुळे मेळावा अजित पवारांचा आणि अपेक्षा शरद पवार पक्षाच्या नेत्यांकडून असा काहीसा गोंधळ दिसला. त्यामुळे मतदारांमध्ये एक वेगळाच संदेश जाण्याची शक्यता आहे.

गुरुवारपासून सुरू झालेल्या उपमुख्यमंत्री पवार यांच्या जन सन्मान यात्रेतील कार्यक्रम पाहता ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा प्रभाव असलेल्या नेते आणि मतदारांशी ते संबंधित आहेत. त्याचे प्रतिबिंब देखील अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत उमटले.

यावेळी काही शेतकऱ्यांनी तुम्ही ऊस उत्पादकांना जास्त महत्त्व देता. साखर कारखाने राजकारणाचे केंद्र असते. तुम्ही द्राक्ष उत्पादकांकडेही लक्ष द्या, अशी सूचना केली. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी अतिशय सूचक वक्तव्य केले.

ते म्हणाले, "तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवा. येत्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला मदत करा. एक वर्ष थांबा आणि मग बघा काय होते" उपमुख्यमंत्री पवार यांचे हे वक्तव्य बोलके आहे. या वक्तव्यातून दोन शक्यता सूचित होतात.

एक तर त्यांना विधानसभा निवडणुकीची धास्ती वाटते आहे. दुसरे म्हणजे आगामी काळात राज्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळेल, अशी अपेक्षा दिसते. हे प्रत्यक्षात कसे आणि केव्हा येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नाशिक जिल्ह्यात सहा आमदार आहेत. या सहाही आमदारांमध्ये निवडणुकीला सामोरे जाताना साधनसामुग्रीची प्रचंड श्रीमंती दिसते. मात्र कार्यकर्ते आणि जनमानसातील या आमदारांविषयीची सहानुभूती कमी झालेली जाणवते.

नाशिक जिल्ह्यातील आमदार निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी इकडून तिकडे उड्या मारण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकंदरीत उपमुख्यमंत्री पवार यांच्या जन सन्मान यात्रेत लाडकी बहीण, लाडका भाऊ, विज बिलाची माफी अशा अनेक घोषणांचा पाऊस पाडला जात आहे.

मतदार त्या घोषणांच्या पावसाने चिंब होऊन मतदानाचा आशीर्वाद देतील का? याची चिंता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आणि विरोधक दोघांनाही आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री पवार यांचे "एक वर्षभर थांबा" या वाक्यात काय दडले आहे, याची दबकी चर्चा सुरूआहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT