Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics: अजित पवार यांना धमकीची पोस्ट टाकणारा निघाला रेल्वे कर्मचारी, काय आहे प्रकरण?

Ajit Pawar;Railway employee threatens Deputy Chief Minister Ajit Pawar-उपमुख्यमंत्री पवार यांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचे आवाहन व्हाट्सअप वर करण्यात आले होते.

Sampat Devgire

Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते भगूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमावरून विरोधकांनी टीका केली होती.

https://www.sarkarnama.in/topic/ajit-pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या दौऱ्यात व्हाट्सअप वरून अज्ञात व्यक्तीने धमकी दिली होती. संबंधित व्यक्तीने अक्षय भाषेत ‘उपमुख्यमंत्री पवार यांना केवळ काळे झेंडे दाखवू नये तर, पेट्रोल ओतून पेटवून द्यावे’, असे धक्कादायक आवाहन केले होते. त्यामुळे शहरात खळबळ उडाली होती.

या संदर्भात पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबंधित एका ग्रुप वरून आलेल्या या मेसेजचा शोध घेतला. त्यामध्ये संबंधित मेसेज ‘देवळाली विधानसभा १२६ मनसे’ या ग्रुप वरून आल्याचे स्पष्ट झाले. त्याचा शोध घेऊन संबंधित पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. यामध्ये संतोष फोकणे यांनी ही पोस्ट केल्याचे आढळले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फोकणे हा रेल्वे कर्मचारी आहे. त्यामुळे एका शासकीय कर्मचाऱ्याकडूनच हा प्रकार घडल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

या संदर्भात पोलिसांम्बलदार पंढरीनाथ सोपान आहेर यांनी फिर्याद दिली होती. पोलीस उपनिरीक्षक देवरे यांनी या प्रकरणाचा तपास केला. सोशल मीडियावरील या पोस्टद्वारे परिसरात दंगल घडून यावी तसेच राजकीय पक्षांमध्ये वाद निर्माण व्हावा यासाठीची चिथावणी देण्याचा हा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भगूर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प झाला. मात्र शिवसेना शिंदे पक्षाचे विजय करंजकर यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून महायुतीच्या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये चांगलाच राजकीय वाद रंगला होता. या पार्श्वभूमीवर संतोष फोकने यांची पोस्ट पोलिसांच्या रडारवर आली होती.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT