Dr Satish Patil, Ajit Pawar & Gulabrao Devkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics: ज्यांना मंत्री केले, त्याच नेत्यांनी शरद पवार यांची साथ सोडली... जळगावचे दोन माजी मंत्री अजित पवारांच्या गोटात!

Ajit Pawar; Sharad Pawar followers Satish Patil and gulabrao devkar will join NCP Ajit Pawar-स्थानिक नेत्यांचा प्रखर विरोध, त्यामुळे माजी मंत्री सतीश पाटील, गुलाबराव देवकर यांचे होणारे पक्षांतर कोणाच्या पत्थ्यावर?

Sampat Devgire

Jalgaon NCP News: सध्या महायुतीच्या सत्तेच्या सावलीत प्रत्येकाला राजकीय विसावा घ्यावासा वाटतो आहे. सत्तेच्या विरोधात राहून संघर्ष करण्याचे मनोबल बहुतांश नेत्यांकडे राहिलेले नाही. जळगाव जिल्ह्यात देखील त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जळगावच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. यामध्ये प्रारंभी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी शरद पवार पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महायुतीच्या घटक पक्षांनी त्यांच्यासाठी दरवाजे उघडले नव्हते.

आता मात्र माजी मंत्री डॉ. पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देशमुख हे येत्या दोन-तीन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. प्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. हा पक्षप्रवेश सहजासहजी झालेला नाही. बहुतांशी स्थानिक नेत्यांनी या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाला प्रखर विरोध केला होता. अद्यापही हा विरोध कायम असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाची सध्याची संघटनात्मक स्थिती विचारात घेता, जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथील अनिल भाईदास पाटील हे एकमेव आमदार अजित पवार पक्षाचे आहेत. उर्वरित नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार पक्षाचे फारसे प्राबल्य नाही. त्यामुळे या दोन माजी मंत्र्यांना प्रवेश देऊन पक्षाला लाभ होईल, असा वरिष्ठांचा होरा आहे.

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार हे सतीश पाटील यांनी सतीश पाटील यांच्या प्रवेशाला जाहीरपणे विरोध केला होता. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर हे दोघेही जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकीय गटबाजीतून सतीश पाटील यांच्या प्रवेशाला जिल्हा अध्यक्षांसह विविध पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता.

या पार्श्वभूमीवर दोन्ही माजी मंत्र्यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होत आहे. हा प्रवेश देखील मुंबईत होण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे प्रवेश झाला तरीही स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या दोन्ही नेत्यांना कितपत स्वीकारतील हा चर्चेचा विषय आहे. विशेष म्हणजे स्थानिक राजकारणात आणि पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात या दोन्ही मंत्रांना हस्तक्षेप करता येणार नाही, या अटीवर हा प्रवेश झाल्याचे बोलले जाते.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आत्मविश्वास गमावल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील पाच वर्ष विरोधात राहून काय साध्य होणार असे राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असावे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सातत्याने सत्तेबरोबर राहण्यातच धन्यता मानणारा आहे. मुळेच या दोन मंत्र्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश होत आहे. या नेत्यांना नव्या घरात कितपत स्वीकारले जाते हा चर्चेचा विषय आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT