Ajit Pawar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar : "दादा येणार, गुलाल उधळणार? अजित पवारांच्या एका दौऱ्यावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य

Ajit Pawar visit political significance : अजित पवारांच्या एका दौऱ्यावर राजकीय समीकरणे बदलणार का? दादा येणार, गुलाल उधळणार का, जाणून घ्या सविस्तर.

Sampat Devgire

Ajit Pawar News : महापालिका निवडणुकीत महायुतीची चर्चा शेवटच्या क्षणी फिस्कटली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने शिवसेने हात धरला. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाशी युती केली आहे. या दोन्ही पक्षांनी मिळून महापालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आलेले नाही.

निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आपले दौरे सुरू केले आहे. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार प्रयत्न आणि रणनीती आखण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि अजित पवार पक्षाच्या उमेदवारांपुढे भाजपचेच आव्हान आहे. भाजपकडून सत्ताधारी पक्ष म्हणून जोरदार मोहीम राबविली जात आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीत अद्याप लक्ष घातलेले दिसत नाही.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मात्र प्रकृती अस्वस्थ त्यामुळे त्यांचे फायर ब्रँड नेते छगन भुजबळ आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे प्रकृतीच्या कारणामुळे प्रचारापासून लांब आहेत. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अधिक प्रभावी यंत्रणा निर्माण करण्यावर स्थानिक नेत्यांचा भर आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या प्रचार दौऱ्यात भाग घ्यावा असे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नेत्यांकडे उमेदवारांकडून सातत्याने ही मागणी केली जात आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचेच लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचारासाठी केव्हा येणार याकडे लागले आहे.

सध्या तरी उपमुख्यमंत्री पवार हे प्रामुख्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड या आपल्या होम ग्राउंड वर रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपचे आव्हान आहे. त्या दृष्टीने मुख्य लढत या पक्षांमध्ये होईल असे चित्र आहे. त्यामुळे अजित पवार पुणे या आपल्या घरच्या महापालिकेतून प्रचारासाठी बाहेर केव्हा पडणार? की पुण्यातच अडकून पडणार याची चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT