Ajit Pawar & D. L. Karad
Ajit Pawar & D. L. Karad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar On Workers Issues: कामगारांच्या समस्यांबाबत लक्ष घालणार!

Sampat Devgire

सातपूर : (Nashik) राज्यातील (Maharashtra) कामगारांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्‍नांबाबत विरोधी पक्षनेते या नात्याने आपण लक्ष घालावे अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना करीत सीटूचे (CPM) सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड (Dr. D. L. Karad) यांनी त्यांच्या सखोल चर्चा केली. (Dr. D. L. Karad & Ajit Pawar discussion on Workers issues in Nashik)

श्री. पवार यांच्या हस्ते आज सातपूरच्या पपया नर्सरीजवळील शीव मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन झाले, त्याप्रसंगी डॉ. कराड यांनी श्री. पवार यांना कामगारांच्या प्रश्‍नांबाबत अवगत केले.

‘कामगार संघटना संयुक्त कृती समितीची आपल्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करावी. सरकारचे कामगारविषयक धोरण, कामगारांचे सध्या निर्माण झालेले प्रश्न, असंघटित कामगारांच्या समस्या याबाबत चर्चा करणे शक्य होईल. जिल्ह्यात औद्योगिक कामगारांचे प्रश्‍न तीव्र झाले आहेत.

कामगार खात्यातील जवळपास ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामगारांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही. त्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहेत. राज्यात कामगार विषयक त्रिपक्षीय समित्या अजूनही गठित केलेल्या नाहीत. अनेक मंडळे ( सुरक्षा रक्षक मंडळ, माथाडी मंडळ) अधिकाऱ्यांमार्फत चालविली जातात.

या त्रिपक्षीय समित्या व कामगार विषयक मंडळावर राष्ट्रीय कामगार संघटनांचे प्रतिनिधी घेणे अपेक्षित आहे. या समित्या व मंडळे गठित करून त्यावर राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनांचे प्रतिनिधी घेण्यात यावेत असे डॉ. कराड यांनी सांगितले.

याशिवाय महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या निधीचा विनियोग व्हावा, १२२ प्रकारची कामे करणाऱ्या असंघटित कामगारांची कल्याणकारी मंडळे स्थापन करावेत. ऊस तोडणी कामगारांसाठी असलेले स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कामगार खात्यांतर्गत असावे यासह विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT