Ajit Pawar| 
उत्तर महाराष्ट्र

अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचा इशारा: हे कायद्याचे राज्य...

Ajit Pawar|Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी तीन तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी तीन तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. काल औरंगाबादमध्ये झालेल्या सभेतही त्यांनी तीन मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवावे लागलीत अन्यथा त्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इथे कायद्याचे राज्य आहे. कोणाचीही हुकूमशाही चालणार नाही, अल्टिमेटम वगैरे काही नाही. असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. सभा कुणाचीही असो, कायद्याप्रमाणे आणि नियमाने ज्या गोष्टी आहेत त्यांचे सर्वांना पालन करावे लागणार आहे. नियम लावले तर सर्वांनाच लावले जातील. फक्त मशिदींवरचे भोंगे काढायचे आणि इतर ठिकाणचे काढायचे नाहीत, असे कसे होईल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

पोलिसांनी पोलिसांचे काम करायचे आहे. जर सभेमध्ये कायद्याचे पालन केले असेल तर ठीक कायद्याचे उल्लंघन असेल तर कारवाई तर होणारच. निवडणूकांपूर्वी राज ठाकरे भाजपविरोधात बोलत होते. आता त्यांचे मत परिवर्तन झाले. पण केसेस कार्यकर्त्यांवर होतील. त्यामुळे मी म्हणेल तेच होणार, हे शक्य नाही. राज्यात विविध समाजाचे लोक आहेत. तसा कायदाही सर्वांना सारखाच आहे. तो मोडला तर कारवाई होणार असल्याचा इशारा अजित पवारांनी दिला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत परवानगी आहे. त्याप्रमाणेच सर्व सुरू आहे. पण शिवतीर्थावर बसून भाषण करून लोकांना भडकवणे सोपे असते. पण त्यामुळे निर्माण होणारा जातीयवाद, समाजिक तेढ महाराष्ट्राला परवडणारी नाही, असे मत अजित पवारांनी व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT