Eknath shinde, devendra fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahayuti Politics : महायुतीत गृह खात्यावरून धुसफूस सुरू असतानाच भाजपमुळे शिंदेंच्या आमदाराच्या अडचणी वाढल्या

Mahayuti Politics Shivsena Vs BJP : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या दरे या गावी गेल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे भाजपकडून आता शिंदेंच्या शिवसेनेला डावललं जात आहे का? अशा चर्चा सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Jagdish Patil

BJP Vs Shivsena : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा (CM Of Maharashtra) चेहरा ठरला आहे, मात्र इतर खाते वाटपावरून युतीत धुसफूस सुरू असल्याचं उघडकीस आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला असला तरी ते गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तर भाजप (BJP) देखील हे पद शिंदेसेनेसाठी सोडायला तयार नसल्याची चर्चा आहे.

याच वादामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज होऊन आपल्या दरे या गावी गेल्याचं सांगितलं जात आहे. एकीकडे भाजपकडून आता शिंदेंच्या शिवसेनेला डावललं जात आहे का? अशा चर्चा सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी (MLA Amshya Padvi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पाडवी यांच्यावर एका महिलेने विनयभंग आणि मारहाण केल्याचा गंबीर आरोप केला आहे. महत्वाची बाब म्हणजे आरोप करणारी महिला आणि तिचा भाऊ भाजपाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शपथविधीपूर्वीच महायुतीमधील (Mahayuti) वाद चव्हाट्यावर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीदरम्यान नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे मोठा राडा झाला होता. सोरापाडा येथे भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. या राड्या प्रकरणी आता आमदार आमश्या पाडवी यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंग आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे शिंदेंच्या आमदारावर आरोप करणारी महिला आणि तिचा भाऊ हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं समोर आलं आहे. तक्रार करणाऱ्या महिलेचा भाऊ भाजपकडून सध्या पंचायत समितीचा सदस्य आहे. तर ग्रामपंचायत आणि विधानसभा निवडणुकीत आमश्या पाडवी यांच्याविरोधात काम केल्याच्या रागातून कुटुंबातील महिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांना मारहाण केल्याचा आरोप पाडवी यांच्यावर करण्यात आला आहे.

आमदार पाडवी यांचा मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, मुलगी सोरापाडा सरपंच अंजू पाडवी यांच्यासह पाडवी यांच्या कार्यकर्त्यांवर अक्कलकुवा पोलिस स्टेशनमुध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार आमश्या पाडवी यांच्या मुलीनेही भाजप पदाधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली केली आहे. त्यामुळे एकीकडे महायुती सरकारचा शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू असतानाच भाजप आणि शिंदे गटातील वाद उफाळून आल्याचं दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT