Yeola Politics : अजित पवार आणि त्यांचे काही समर्थक आमदारांनी भाजपसोबत सत्तेत सामील झाले आणि राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. यामुळे राज्याच्या राजकारणाला एक वेगळच वळण मिळालं आहे. या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील पुन्हा अॅक्टिव्ह मोडवर आले आहे. आज शरद पवार यांची भुजबळांच्या बालेकिल्ल्यात आज (८ जुलै) पहिली सभा होणार आहे.
या सभेच्या निमित्ताने एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. शरद पवार यांच्यासाठी येथील प्रमुख चारही नेते २०-२५ वर्षानंतर प्रथमच एकाच व्यासपीठावर आले आहे. या सभेनिमित्त माणिकराव शिंदे यांच्यासह येवल्याच्या माजी आमदार मारोतराव पवार, शिवसेनेचे आमदार नरेंद्र दराडे तसेच सहकार नेते अंबादास बनकर हे सर्व आज शरद पवारांच्या सभेसाठी एकाच मंचावर उपस्थित आहे. या नेत्यांच्या एकत्रीकरणामुळे सभास्थळी एकच चर्चा सुरू आहे.
याशिवाय माजी आमदार उत्तमबाबा भालेराव ,संजय चव्हाण,कल्याणराव पाटील,शिरुरचे अशोक पवार,चांगदेव होळकर आदी नेतेही सभेला उपस्थित आहेत.अद्याप सभा सुरू झालेली नाही. मात्र येवला कृषि उत्पन्न बाजार समितीतील सभामंडपात एकच गर्दी जमली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार येवला येथील सभेसाठी जात असताना विंचूर तीनपाटी येथे कार्यकर्त्यांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर ते येवल्याकडे मार्गस्थ झाले.
दरम्यान, 2004 मध्ये भुजबळांना येथून उमेदवारी द्या, असा हट्ट धरत शिंदेंनी थेट पवार साहेबांपुढे घोषणाबाजी केली होती,आज हेच समीकरण पूर्णतः विरोधाभासाचे झाले आहे.2019 च्या निवडणुकीत भुजबळांच्या विरोधात प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेश चिटणीस असलेल्या शिंदे यांना थेट पक्षातून निलंबित केले होते गेले.
तीन वर्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या शिंदे यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. किंबहुना सिल्वर ओक'ला जाऊन भेट घेत येवल्यात पहिली सभा घेण्याचा आग्रह केला होता. अखेर आज या ठिकाणी शरद पवार यांची मोठी सभा होणार आहे.या मतदारसंघात आजही शरद पवारांचे वलय असल्याने ही सभा भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरेल का, याकडेही आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.