Guardian Minister Chhagan Bhujbal at Yeola Municiple office
Guardian Minister Chhagan Bhujbal at Yeola Municiple office Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

स्वच्छतेत सफाई कामगारांचे उपकार विसरु नका!

Sampat Devgire

येवला : कुठल्याही शहराचे सौंदर्य व आरोग्य राखण्यासाठी साफ सफाईचे काम अतिशय महत्वाचे असून सफाई कामगारांचे योगदान महत्वपूर्ण आहे. कोरोना काळातील खरे योद्धा तेच असल्याने कुठल्याही शहरातील नागरिकांनी सफाई कामगारांचे उपकार विसरता कामा नये असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

नगरपालिकेत स्वच्छ भारत मिशन स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत १४ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून घेतलेल्या १५ हॅडकार्टचे वितरण आज भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक संगीता नांदूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. भुजबळ म्हणाले की, शहरात अस्वच्छतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अनेक साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुठलही शहर हे अधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्याची आवश्यकता असते. स्वच्छतेवर अधिक भर देण्याची गरज असून शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जेवढी सफाई कामगारांची आहे तितकीच जबाबदारी नागरिकांची देखील आहे. कोरोनाच्या अतिशय कठीण काळातही स्वच्छतेचे काम सफाई कामगारांनी केले. त्यांचे योगदान अतिशय महत्वाचे असून ते खरे योद्धा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

मुख्याधिकारी नांदूरकर शहर हितासाठी अनेक चांगले उपक्रम राबवतात, हाही स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने उत्तम निर्णय असल्याचे गौरवोद्गार भुजबळ यांनी काढले. स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, किशोर भावसार, तुषार लोणारी, पवन परदेशी, प्रतिक उंबरे, मुकादम प्रशांत पाटील, मोहम्मद शेख, शकुन बिवाल आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सर्वत्र पोहोण्यासाठी निर्णय

पालिकेमार्फत शहराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात असून स्वच्छ भारत अभियानअंतर्गत १५ हॅन्डकार्ट याच कामासाठी घेण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक संगीता नांदूरकर यांनी यावेळी दिली.कामगार चांगलं काम करतात पण काही भागात मोठ्या गाड्या जात नव्हत्या, त्यामुळे शहराच्या स्वच्छतेसाठी कानाकोपर्यात जाण्यासाठी प्रशासकिय काळात भुजबळ साहेबांच्या मदतीने हॅन्डकार्ट घेण्यात आल्या आहेत. गावठाणासाठी दोन वर्षांपूर्वी पालिकेने १० मोठ्या गाड्या घेतल्या होत्या. आता १५ लहान गाड्या घेतल्या असून जेथे जाता येत नव्हते त्या भागांत घनकचरा संकलित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT