अमित शाह यांनी महाराष्ट्र सरकारच्या (शिंदे–फडणवीस–अजित पवार त्रिमूर्ती) शेतकरी मदतीच्या निर्णयांचे कौतुक केले.
केंद्र सरकारने ३१३२ कोटी रुपयांची मदत दिली असून, राज्य सरकारने २२०० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान, धान्य, कर्जवसुली स्थगिती आणि शुल्क माफीसारखे दिलासादायी निर्णय घेतले आहेत.
Ahilyanagar : महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजी, एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे त्रिमूर्ती आहेत, या तिघांपैकी एकही बनिया (व्यापारी) नाहीत. पण, हे तिघेही पक्के व्यापारी तत्वाचे आहेत. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी मला बोलावले आणि मोठ्या हुशारीने विचारले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी भारत सरकार काय करणार? अशा शब्दांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उमुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी केलेल्या वकिलीचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कौतुक केले.
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीस गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शेतकरी मेळाव्यात बोलताना गृहमंत्री शाह यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले.
अमित शाह म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर यावर्षी इंद्रदेवाने अतिवृष्टीच्या माध्यमातून मोठे संकट पाठविले होते. अतिवृष्टीमुळे सुमारे ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन आणि पिकांचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने ३१३२ कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. यातील १६०० कोटी रुपये एप्रिल महिन्यातच देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले आहे.
महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांसाठी २२०० कोटींचे पॅकेज दिले, त्यातून ३१ लाख शेतकऱ्यांना मदत मिळेल. पूरग्रस्तांना दहा हजार रुपये अनुदान आणि ३५ किलो धान्य तातडीने देण्याचे काम केले आहे. ई-केवायसीची अट या वर्षी शिथिल करण्याचे काम केले आहे. कर्जवसुलीला स्थगिती दिली आहे. शेतसारा आणि शैक्षणिक शुल्क माफीचाही निर्णय घेतला आहे, असेही शाह यांनी नमूद केले आहे.
अमित शाह म्हणाले, महाराष्ट्र सरकारमधील त्रिमूर्तींसोबत कालच माझी प्रदीर्घ कालावधीची एक बैठक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी त्यांना आश्वस्त केले आहे की, महाराष्ट्र सरकारने आम्हाला अतिवृष्टीच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल पाठवावा. पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तातडीने निर्णय घेतील.
शेतकऱ्यांंची चिंता करणारे महायुती सरकार राज्यातील लोकांनी निवडून दिले आहे. आमच्या एनडीएचे सर्व लोकप्रतिनिधी एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दिले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही साखर कारखान्यांनाकडून मदतीची घोषणा केली आहे. तसेच, अनेक ट्रस्टही फडणवीसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पुढे येत आहेत, असेही अमित शाह यांनी नमूद केले.
प्रश्न 1 : अमित शाह महाराष्ट्रात कोणत्या कार्यक्रमासाठी आले होते?
विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी.
प्रश्न 2 : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने किती मदत दिली आहे?
३१३२ कोटी रुपये.
प्रश्न 3 : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणते पॅकेज दिले आहे?
२२०० कोटींचे मदत पॅकेज.
प्रश्न 4 : शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय घेतले आहेत?
अनुदान, धान्य, कर्जवसुली स्थगिती आणि शुल्क माफी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.