Amruta Fadnavis reaction Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amruta Fadnavis reaction : “माझा भाऊ जे करायचे ते शांततेतच करतील”; जरांगे पाटलांच्या मुंबईकूचवर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

Amruta Fadnavis reacts to Manoj Jarange Patil's proposed Mumbai protest amid preparations at Antarwali Sarati : मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशील असून सरकार मार्ग काढेल, असे अमृता फडणवीस म्हणाल्या; अंतरवाली सराटीत मुंबईकूचच्या तयारीला वेग

Pradeep Pendhare

Manoj Jarange Mumbai Protest : 'सणवाराचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ जे करायचे ते शांतीपूर्वकच करतील', असे अमृता फडणवीस यांनी मनोज जरंगे पाटील यांना उद्देशून म्हटले आहे. मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईला येण्याचा इशारा दिला होता. यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, अंतरवाली सराटी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. मराठी समाजाच्या बैठकीबरोबरच, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, मीडिया व्हॅन यांची तयारी केली आहे.

अहिल्यानगर येथे समर्पण चातुर्मास कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आल्या आहेत. माध्यमांशी बोलतांना, मराठा आरक्षणाचा विषय हा संवेदनशील असून राज्य सरकार त्यावर मार्ग काढेल, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची निर्णायक राज्यव्यापी बैठकीला 12 वाजता सुरूवात होणार आहे. मात्र तत्पूर्वीच अंतरवाली सराटीत हालचालींना वेग आला असून, मुंबईला जाण्याची तयारी सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, मीडिया व्हॅन बैठक स्थळी तयारीनीशी सज्ज ठेवण्यात आले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा जो गतवेळेस देखील मुंबईला, जायच्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीमध्ये होता, तोच अश्वारूढ पुतळाचा रथ अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय जाहीर करण्याअगोदरच मुंबईला जाण्यासाठी ज्याची आवश्यकता आहे, त्या सर्व हालचाली अंतरवाली सराटीत सुरू झाल्या आहेत. अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची मोठी गर्दी झाली आहे. यामुळे पोलिस देखील सज्ज झाले आहे. वडीगोद्रीच्या चौकातील अंतरवाली सराटीच्या वेशीवरच पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.

फडणवीस अन् जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या 13व्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जेवणाचे निमंत्रण दिले होते. मनोज जरांगे पाटील हे माझे भाऊ आहेत, त्यांना मी घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, असे म्हटल्या होत्या. जरांगे पाटील यांनी, ताईने सांगितले ना... मग जेवायला पण जाऊ...पण भाऊ मैदानात असताना, आंदोलन करत असताना बहिणीने जेवण्यासाठी भाऊला बोलवू नये. शिकारीच्या वेळेला इकडेतिकडे बघू नये. बहिणीने याबाबत बारकाईने विचार करावा. मी भाऊबीजेला जेवायला येईन. बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावे, साडीचोळी घेऊन जाऊ, असे म्हटले होते.

जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष

जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचे जवळपास निश्चित केले आहे. यावर पुन्हा अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर जरांगे पाटील काय प्रत्युत्तर मिळते याकडे लक्ष लागले आहे. याशिवाय बैठकीत काय निर्णय होतो, याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT