MLA Dilip Borse agitation News
MLA Dilip Borse agitation News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

संतापलेल्या आमदार बोरसेंचा ५ तास ठिय्या देत गोंधळ!

Sampat Devgire

सटाणा : बागलाण (Satana) तालुक्यात वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा (Power cut) आणि सुरू केलेल्या भारनियमनाविरोधात आमदार दिलीप बोरसे (Dilip Borse) आक्रमक झाले असून, बुधवारी आमदार बोरसे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण (Mahavitaran) कंपनीचे कार्यकारी अभियंता सतीश बोंडे यांच्या दालनात तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केले. (MLA Dilip Borse agitation News)

चार दिवसांपासून तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ आल्याने संतप्त झालेले बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा यांच्यासह शेतकऱ्यांनी हल्लाबोल करून सकाळी ११ ला अचानक महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले.

या वेळी आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून गोंधळ घातला. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करत नाही आणि दिवसा शेतीला वीज देत नाही तो प्रयत्न ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. दरम्यान, मालेगाव सर्कलचे अधीक्षक अभियंता सानप, कार्यकारी अभियंता सतीश बोडे यांनी आमदार बोरसे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला.

जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत लेखी हमी देत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली. दुपारी चारच्या दरम्यान चर्चेच्या दुसऱ्या फेरीत अधीक्षक अभियंता सानप, कार्यकारी अभियंता सतीश बोंडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता बनसोडे यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात बाजार समितीचे संचालक नरेंद्र अहिरे, प्रभाकर रौंदळ, कांदा उत्पादक संघटनेचे प्रमुख अभिमान पगार, टेंभेचे सरपंच भाऊसाहेब अहिरे, सुभाष अहिरे, सुधाकर पाटील, अभिमान देवरे, सरपंच परिषदचे तालुकाप्रमुख संदीप पवार, ब्राम्हणगावचे सरपंच किरण अहिरे, सागर अहिरे, गौरव वाघ, योगेश सूर्यवंशी, धर्मेंद्र कोर, राकेश मोरे, विनोद अहिरे, सुनील जाधव, जगन भामरे, प्रकाश भामरे, राजेंद्र रौंदळ, किरण रौंदळ आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT