Anil Desai & Uddhav Thackeray.jpg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anil Desai Politics: अनिल देसाई म्हणाले, पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच!

Sampat Devgire

Anil Desai News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या संदर्भात पक्षाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. खासदार अनिल देसाई यांनी नाशिक जिल्ह्यातील निवडणुकीचा आढावा घेतला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी नाशिक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. यावेळी पक्षाच्या विविध वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.

आगामी निवडणुकीत शिवसेना हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. त्यामुळे आपल्याला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. त्यासाठी सर्वांनी कार्यरत व्हावे असे आवाहन देसाई यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बूथनिहाय यंत्रणा निर्माण करण्याबरोबरच सहकारी पक्षांची समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा न घेता कार्यकर्त्यांची देखील चर्चा करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांचा अभ्यास करण्यात आला. यावेळी प्रत्येक बूथ वर किती मतदान झाले आणि शिवसेनेच्या उमेदवाराला किती मते मिळाली याचा आढावा घेण्यात आला.

ज्या ठिकाणी शिवसेना मागे आहे तेथे विधानसभा निवडणुकीत काय उपाययोजना करायची, याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. शिवसेनेविषयी सामान्य नागरिकांत अनुकूल वातावरण आहे. त्याचे रुपांतर मतांमध्ये करायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रीय व्हावे.

महाविकास आघाडीचे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे पक्ष पुढील मुख्यमंत्री कोण आणि जागावाटप या दोन्ही संदर्भात चाचपडत आहे. असे असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मात्र अनेक मतदारसंघात थेट निवडणुकीचा प्रचार सुरू करण्यात आला आहे.

नाशिक शहरातील नाशिक मध्य मतदार संघातून माजी आमदार वसंत गीते यांचे, नाशिक पश्चिम मतदार संघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नावाचा ठराव करण्यात आला आहे. ही दोन्ही नावे वरिष्ठांकडे पाठवण्यात आली आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या सहकारी पक्षांची मात्र चांगलीच कोंडी झाली आहे.

जिल्ह्यातील अन्य मतदार संघाबाबत लवकरच जागावाटप आणि उमेदवार दोन्ही विशेष स्थानिक पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून विशेष अभियान राबविले जात आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय संघटना अधिक मजबूत करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

यानिमित्ताने मतदारसंघातील उमेदवार दोन्हींबाबत शिवसेनेने घेतलेली आघाडी चर्चेचा विषय आहे. यावेळी पक्षाचे सचिव प्रवीण महाले, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, नितीन आहेर, गणेश धात्रक, आमदार नरेंद्र दराडे, कुणाल दराडे, लोकसभा संघटक निवृत्ती जाधव, डी. जी. सूर्यवंशी यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT