Anil Gote
Anil Gote Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अहिल्यादेवींविषयी उल्लेखाने अनिल गोटे वादात सापडले?

Sampat Devgire

नगर : चौंडी (नगर) (Ahemdnagar) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयतीचा कार्यक्रम एका नव्या वादाने पुन्हा चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी केलेल्या विधानामुळे अहिल्यादेवींच्या अनुयायांनी खर्डा चौक येथे निदर्शने करीत श्री. गोटे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. (People Deemands action against Anil Gote on Ahilyadevi Holkar`s word)

जयंतीच्या कार्यक्रमातील भाषणाचा प्रारंभ करताना श्री. गोटे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख राजमाता किंवा महाराणी असा न करता पुण्यश्लोक करावा अशी सूचना केली होती. त्यानंतर मात्र ही सूचना करतानाच त्यांनी, अहिल्यादेवींना फक्त लोकमाता किंवा पुण्यश्लोक म्हणावे. त्यांना राजमाता कींवा महाराणी असे म्हणू नये. असे बोलल्याने तुम्ही त्यांचा अपमान करीत आहात. राजमाता पायलीच्या पन्नास पडल्या आहेत. महाराणी फुटाफुटावर आहेत, असे त्यांनी म्हटले होते.

माजी आमदार गोटे यांच्या भाषणातील हा मुद्दा आता वादाचा विषय होतो की काय अशी स्थिती आहे. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवप्रेमी तसेच अहिल्यादेवीप्रेमींनी एकत्र येत याबाबत कारवाईची मागणी केली आहे. दुपारी खर्डा चौकात त्याचा निषेध करण्यासाठी ही मंडळी एकत्र आली. त्यांनी याबाबत कारवाईची मागणी केली. त्यामुळे अनिल गोटे पुन्हा एकाद चर्चेत आले आहे.

वादामुळे कार्यक्रम चर्चेत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत चौंडी येथे झाला होता. स्थानिक आमदार रोहीत पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेताल होता. त्याला विविध नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांना त्याचे निमंत्रण नव्हते. त्याची चर्चा झाली. आमदार गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी शहराच्या मुख्य चौकात वाहनांची गर्दी करून वाहतूक कोंडी केली होती. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT