Anil Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anil Patil Politics: मंत्री अनिल पाटील म्हणतात, पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल!

NCP Minister Patil Rejected the Upcoming Assembly Election Surveys: राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल पाटील यांनी महाराष्ट्रात महायुती भक्कम असल्याचा दावा केला आहे.

Sampat Devgire

Anil Patil News: राज्यातील विधानसभा निवडणुकांची लगीनघाई सुरू आहे. सर्वच राजकीय पक्ष त्या प्रक्रियेत व्यस्त आहेत. याबाबत विविध अंदाज वर्तविले जात आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांकडून विविध दावे केले जात आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत विविध राजकीय तज्ञ अंदाज व्यक्त करीत आहेत. याबाबत रोज विविध संस्था सर्वे केले जात आहेत. नुकताच याबाबत जाहीर झालेल्या एका सर्वेत महायुतीच्या जागा कमी होणार असल्याचे म्हटले आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर होण्याचा अंदाज एका निवडणूक सर्वेत व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनीही सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मंत्री पाटील यांनी एक वेगळेच विधान केले आहे. ते म्हणाले, महायुतीचे काम सर्वसामान्य जनतेला पसंत आहे. सर्व समाज घटकांपर्यंत महायुतीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचे लाभ पोहोचलेले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मंत्री पाटील म्हणाले, निवडणूक सर्वे यावर माझा विश्वास नाही. निवडणुकीच्या आधी तयार होणारे सर्व सर्वे व्हाट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये तयार होतात. त्यामुळे त्यावर किती विश्वास ठेवावा, हा गंभीर विषय आहे. या सर्वेमध्ये व्यक्त केलेले अंदाज चुकीचे ठरणार आहेत, असा दावा त्यांनी केला.

येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचाच मुख्यमंत्री होईल. तो मुख्यमंत्री पुढील पाच वर्ष राज्यात कामकाज करील. त्यामुळे निवडणूक सर्वे आणि त्यातील अंदाजानबाबत किती विश्वास ठेवावा असा प्रश्नच आहे. त्यामुळे मी असे सर्व मानत नाही.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या ऑडी कारच्या अपघाताचा प्रश्न सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांनी या संदर्भात भाजप नेते बावनकुळे त्यावर टीकेची जोड उठविली आहे.

याबाबत पोलिसांच्या कारवाईविषयी देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. मंत्री पाटील यांनी या प्रश्नावर बावनकुळे आणि त्यांच्या चिरंजीव दोघांचेही बाजू घेतली आहे. या संदर्भात पोलीस योग्य ती कार्यवाही करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.

कोणालाही वाचविण्याचा प्रयत्न होत नाही. मात्र विरोधकांकडे काही विषयच राहिलेला नसल्याने ते सातत्याने याबाबत भाजप नेते बावनकुळे यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. या राजकारणाला काहीही अर्थ नाही.

विरोधकांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावे. राजकीय नेत्यांच्या व्यक्तिगत विषयांवर प्रश्न उपस्थित करणे आणि पोलीस यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही. यातून काहीही साध्य होणार नाही असा दावाही त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT