Nashik NCP leader Anita Bhamre News, Nashik Political News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अनिता भामरे यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर दावा!

पक्षासाठी केलेल्या कामाचा विचार व्हावा यासाठी पक्षाध्यक्षांकडे केली मागणी.

Sampat Devgire

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षासाठी केलेल्या आजवरच्या कामाचा व नीष्ठेचा विचार करून त्या पदासाठी आपला विचार व्हावा अशी विनंती नाशिकच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी केली आहे. (Nashik NCP leader Anita Bhamre News)

त्या म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष स्थापनेपासून मी पक्षात काम करीत आहे. त्यामुळे आजपर्यंत प्रामाणिकपणे केलेल्या कामावरच राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर काम करण्याची मागणी करणार आहे.

त्या म्हणाल्या, प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात पक्षात काम करणार्‍या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे मी सुध्दा या पदासाठी दावेदार आहे.

पक्ष १० जून १९९९ साली पक्ष स्थापन झाल्यापासून महिला संघटनेत अनेक पदांवर काम केले आहे. सध्या नाशिक जिल्हाध्यक्ष (शहर) या पदावर काम करीत आहे. लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था असो पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार हेच ध्येय ठेवून आजपर्यंत काम केले आहे. महिलांच्या न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरून वेळोवेळी आंदोलन, मोर्चा, निवेदने देऊन संघर्ष करीत आहे. पक्षातील वरिष्ठ नेतृत्व असो अथवा नेत्यांवर विरोधकांनी टीका केल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्याची धमक सुध्दा आपल्यात आहे.

पक्षाची शिस्त, प्रामाणिकपणे काम आणि महिला संघटन या त्रिसूत्रीवर आधारित काम करतांना पक्ष नेतृत्वाने महिला प्रदेशाध्यक्षपदी सर्व सामान्य महिला कार्यकर्ती म्हणून काम करण्याची संधी दिल्यास निश्चितच विश्वासास पात्र ठरेन अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT