Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao patil : गुलाबराव पाटलांनी सांगितलं शिवसेना फुटीचं कारण; ठाकरेंनी ऐकलं नाही म्हणून...

सरकारनामा ब्यूरो

शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे गट आणि भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट अनेक वेळा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. तर शिवसेनेतून शिंदे गट नेमकी बाहेर का पडला याच कारण गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे. ''उध्दव ठाकरे यांनी ऐकलं नाही म्हणून आम्हाला दुसरा मार्ग पत्करावा लागला'', असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले, ''नव्या वर्षात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करणार आहे. गेले अनेक वर्षे लोकं वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतात. मात्र मी मतदारसंघात फिरतोय. कारण शिवसेनेचे वैभव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये उभे करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे '', असं ते म्हणाले.

''पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांचं सर्वांच एक स्वप्न आहे. की हर घर जल आणि हर घर नल. २०२४ मध्ये याच गुलाबराव पाटलाला पाणीवाला बाबा म्हणून लोकं ओळखतील. रोज सकाळी आमचा जनता दरबार असतो. कितीतरी लोकं आमच्याकडे समस्या घेऊन येतात. त्या आम्ही सोडवण्याच काम करतो. आम्ही काय सिझनेबल पुढारी नाहीत. पाऊस आला आणि छत्री उघडली, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला.

''माझ्यावर अनेक जण टीका करतात. पण टीका देखील करायला पाहिजे. कारण ज्या झाडाला फळे असतात त्याच झाडाला लोकं दगडं मारतात. गुलाबराव साधासुधा नाही. त्याला सुगंध आहे तसे काटे पण आहेत. मात्र जेव्हा शिवसेनेत फुट पडण्याचा प्रकार घडला. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काहीच ऐकून घेतलं नाही. त्यामुळे आम्हाला पक्ष टिकवण्यासाठी नवा मार्ग पत्करावा लागला. मात्र तो माझ्या जीवनातला दुःखाचा क्षण होता, असं गुलाबराव पाटील (Gulabrao patil) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT