Helicopter  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

रस्त्यासाठी माजी सैनिकाने टेकले हात; थेट मुख्यमंत्र्यांकडे केली हेलिकॉप्टरसाठी अर्थसाह्याची मागणी

सरकारनामा ब्यूरो

अहमदनगर : आपल्या गावातून वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने एका माजी सैनिकाने थेट मुख्यमंत्र्यांकडे हेलिकॉप्टर घेण्यासाठी अर्थसाह्य मिळण्याची मागणी केली आहे. खराब रस्त्याचा प्रश्न पाठपुरावा करूनही मार्गी लागत नसल्याने माजी सैनिकाने अजब फंडा शोधून काढला आहे. थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित हेलिकॉप्टर घेण्यासाठी अर्थसाह्य देण्याची मागणी केलीय.

माजी सैनिकाने नेमकं काय मागणी केली?

अहमदनगरच्या शेवगाव (Shevgaon) तालुक्यातील सालवडगावपासून काही अंतरावर हनुमानवस्ती आहे. ३५० ते ४०० या वस्तीची लोकसंख्या आहे. मात्र सालवडगावपासून हनुमानवस्तीवर जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता होत नसल्याने येथील एका माजी सैनिकाने अजब फंडा शोधून काढला आहे. आपल्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता होत नसल्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हेलिकॉप्टरसाठी (Helicopter) अर्थसाह्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

हनुमान वस्तीवर जाण्यासाठी चांगल्या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र तरी देखील रस्ता होत नसल्याने माजी सैनिक दत्तू भापकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं. या पत्रामध्ये त्यांनी तुम्ही रस्ता देऊ शकत नाही तर हेलिपॅड आणि हेलिकॅप्टरसाठी अर्थसहाय्य द्या, अशी मागणी केली आहे.

पावसाळ्यामध्ये या रस्त्याची दयनीय अवस्था होते. तहसीलदारांकडे वारंवार मागणी करूनही रस्ता होत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या भापकर यांनी मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहीत हेलिकॉप्टरच्या अर्थसाह्यासाठी मागणी केली आहे. पावसाळ्यात या रस्त्याची दयनीय अवस्था होते. त्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.

या रस्त्याबाबत तहसीलदारांकडे वारंवार मागणीही करण्यात आली. मात्र तरीही रस्ता झाला नाही. त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहीत हेलिपॅड आणि हेलिकॅप्टरसाठी अर्थसहाय्य द्या, अशी मागणी भापकर यांनी केली . त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या या अजब मागणीची राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT