Asaduddin Owaisi Ahilyanagar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Asaduddin Owaisi Ahilyanagar : वो आ रहे है, बहुत 'पाॅलिटिक्स' होगा! 'डरकाळी' फोडण्याचं ठिकाण अन् तारीख ठरली; पण...

Asaduddin Owaisi AIMIM Rally in Ahilyanagar on Thursday : AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगर शहरात उद्या गुरूवारी सभा होत असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून नियोजन सुरू आहे.

Pradeep Pendhare

AIMIM public meeting Ahilyanagar : पोलिस परवानगी असून देखील 'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमध्ये आठवड्याभरापूर्वी सभा रद्द झाली होती. पुढील आठवड्यात नक्की येईल, तसा शब्द दिला, सभेच्या तयारीसाठी राबलेले कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली.

असदुद्दीन ओवैसी यांची उद्या, गुरूवारी (ता. 09) अहिल्यानगर शहरातील बहु मुस्लिम भाग असलेल्या मुकुंदनगरमध्ये सभा होत आहे. असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमध्ये पहिलीच सभा होत असल्याने, ती जोरदार करण्यासाठी 'AIMIM'चे कार्यकर्त्यांनी बैठकांचा पुन्हा सपाटा सुरू केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर असदुद्दीन ओवैसी यांची उद्या, गुरूवारी (ता.09) सभा होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीन अहिल्यानगर शहरातील राजकारण चांगलच ढवळून निघालं. अहिल्यानगर शहराच्या राजकारण प्रभावी करू शकतात, अशा मुस्लिम पदाधिकारी अन् माजी नगरसेवकांनी 'AIMIM'मध्ये प्रवेश केला आहे. हाच प्रवेश आता असदुद्दीन ओवैसी यांच्या उद्याच्या सभेनिमित्त जाहीररित्या होणार आहे.

असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या सभेमुळे अहिल्यानगर शहरातील राजकारणात 'बहुत कुछ पाॅलिटिक्स' होईल, असा स्थानिक राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे. पहिली सभा रद्द झाली, त्यावेळी 'आय लव्ह मोहम्मद' रांगोळी रस्त्यावर काढून मुस्लिमांच्या राजकीय भावना दुखवण्याचा प्रकार झाला. याचा निषेध म्हणून मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला अन् त्याला हिंसक वळण लागले. पोलिसांनी हिंसाचारात असलेल्यांची धरपकड केली. जवळपास 200च्या जवळ मुस्लिम जमावाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. यात 'AIMIM'चे देखील काही पदाधिकारी होते.

जलील यांचा गंभीर आरोपाचे पडसाद उमटणार?

या सर्व पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवैसी यांची सभा होत होती. ती रद्द झाली. 'AIMIM'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तशी पुणे इथं पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. तिथं आम्ही येऊ नये, असे काहींना वाटत होते. यातून काही षडयंत्र रचले गेले. पोलिसांकडून देखील, तसा संशय व्यक्त केला गेला. कारण आम्ही तिथं ताकद निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा निकालात ही ताकद सर्वांच्या लक्षात येईल. 'AIMIM'ने तिथं निर्माण केलेल्या ताकदीचा थेट फटका कोणाला बसेल, हे सर्वांना कळेल. पण तिथं काही षडयंत्र होते हे नक्की! हे सर्व सुनियोजित होते. तसं प्लॅनिंग करून केलेलं होतं, असा गंभीर आरोप सभा रद्द झाल्याचं इम्तियाज जलील यांनी त्यावेळी घोषित केलं होतं. आता या आरोपांचे पडसाद सभेनिमित्ताने पुन्हा उमटणार, असे दिसते आहे.

जलीलांच्या आरोपांवर जगतापांचा पलटवार

इम्तियाज जलील यांच्या या आरोपावर आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार पलटवार केला होता. "आम्ही त्याकडे पाहात नाही. सभा असली काय, नसली काय, आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही. ते स्वतःच्या बचावासाठी असंच करणार, ते काही साधूसंत नाहीत. सभा मोठी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू होता, असे आमदार जगताप त्यावेळी म्हटले होते.

'बहुत कुछ पाॅलिटिक्स होने वाला है'

पण आता असदुद्दीन ओवैसी यांची सभा निश्चित झाली आहे. अहिल्यानगर शहरात उद्या गुरूवारी (ता. 09) सभा होत आहे. या सभेनंतर धुळे इथं शुक्रवारी (ता. 10) सभा होणार आहे. या दोन्ही सभा वादळी होतील, असे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या या सभांमुळे 'बहुत कुछ पाॅलिटिक्स होने वाला है', अशी चर्चा शहरात रंगली आहे.

महापुरूषांची पुन्हा बदनामी

पहिली सभा रद्द झाली, त्यावेळी 'आय लव्ह मोहम्मद' रस्त्यावर लिहिल्यानं अहिल्यानगर शहरातील वातावरण तापलं होतं. आता उद्या सभा होत असताना, तत्पूर्वी शहरात पुन्हा महापुरूषाची बदनामीचा प्रकार झाला. तसंच यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्याविषयी देखील आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला पोस्टर फेकण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT