Nashik Politics : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरण अधिकच गंभीर वळण घेत असून अनेक नवनवीन खुलासे तपासादरम्यान उघड होत आहे. या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून आता याप्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी पथकाने आता मोठी कारवाई करत खरातच्या मिरगाव येथील 'ईशान्येश्वर' मंदिराशी संबंधित तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मंदिराचा पुजारी आणि इतर दोन कर्मचारी यांचा समावेश असून, त्यांच्या चौकशीतून आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांकडून अशोक खरातच्या फार्महाऊसवर नेमक्या कोणत्या प्रकारच्या हालचाली सुरू होत्या तसेच कोणकोणत्या कारणांसाठी लोकांना तेथे आणले जात होते. कोणकोणती लोक तिथे येत होती या सर्व गोष्टींची माहिती काढून तपास केला जाणार आहे. त्यांच्याकडून महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महिलांवर लैंगिंक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या नराधम कॅप्टन अशोक खरात याचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. खरात विरोधात यापूर्वी एका महिलेने तक्रार केली होती. आता खरातविरोधात आणखी ३ पीडित महिला पोलिसांत तक्रार देण्यास पुढे आल्या आहेत. त्यामुळे खरातच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे अशोक खरात याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटी पथकाकडून गोपनियता पाळली जात आहे. या पथकाच्या प्रमुख असलेल्या आयपीएस सातपूते यांनी धडाकेबाज कारवाई सुरु केली असून तपासाला वेग दिला आहे. सलग तिसऱ्या दिवशी खरातची सुमारे आठ तासांपेक्षा अधिक तास कसून चौकशी करीत त्याचा जाबजवाब घेण्यात आल्याचे समजते. (Nashik News)
दरम्यान, खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधव याच्याकडून महत्त्वाची माहिती एसआयटीला मिळाली असून, खरातच्या मोबाईलचा सीडीआरही मागविण्यात आला आहे. त्यातून खरातचे लागेबांधे उघड होण्याची शक्यता आहे. यामुळे संशयित खरातच्या संपर्कात असलेले राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील अनेकांचे धाबे दणाणले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.