Ashok Kharat Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat : अशोक खरातचं डोकं दुखायचं थांबेना, पेनकिलर घेऊनही फरक पडेना ; आता एकच पर्याय.. कोर्टात वकिलांनी केली विनंती

Ashok Kharat Case : अशोक खरातला पोलिस कोठडीत महिना पूर्ण झाला आहे. त्याचा दिवसेंदिवस पोलिस कोठडीतील मुक्काम वाढत असून त्याची तब्येत त्याला साथ देत नसल्याचे दिसत आहे.

Ganesh Sonawane

Nashik Crime News : महिलांच्या लैगिंक शोषण प्रकरणात नाशिकचा भोंदू अशोक खरात याच्याविरोधात पहिला गुन्हा १७ मार्च २०२६ ला रात्री दाखल झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ मार्चला त्याला पोलिसांनी पहाटे तीन वाजेच्या सुमारास नाशिक येथील बंगल्यातून अटक केली होती. खरात गेल्या महिनाभरापासून एसआयटीच्या पोलिस कोठडीत आहे. त्याचा तुरुंगातील मुक्काम दिवसेंदिवस वाढत आहे.

अशोक खरातला न्यायालयाने रविवारी (दि. १९) आणखी एका गुन्ह्यात पोलीस कोठडी सुनावली. महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात SIT ने खरातचा ताबा घेतल्यानंतर, खरातला न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला 23 एप्रिलपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सुनावणी दरम्यान अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टात खरातच्या तब्येतीचा मुद्दा मांडला व एक मागणी केली. खरातच्या खांद्याचे ऑपरेशन झाले आहे. त्याचे डोकेही दुखत आहे. दुखणे थांबावे म्हणून त्याने पेनकिलर तसेच औषध घेऊनही फारसा फरक पडत नाही. त्यामुळे अशोक खरातला वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे घेऊन जावे. त्यासाठी नवीन अर्ज करण्याची गरज भासू नये, अशी विनंती खरातच्या वकिलांनी केली. त्यावर मा. न्यायाधीशांनी पोलिसांना आवश्यक ते औषधोपचार करण्याच्या व न्यूरोसर्जनकडे तपासणीच्या सूचना दिल्या आहेत.

अशोक खरात याच्याविरोधात महिलांचे लैगिंक शोषण, फसवणूक व जादूटोणाविरोधी कलमान्वे १२ गुन्हे दाखल आहेत. यातील अकरा गुन्हे नाशिक शहरातील सरकारवाडा पोलिसांत तर एक गुन्हा शिर्डी पोलिसांत दाखल आहे. त्यामुळे एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या गुन्ह्यात त्याच्या पोलीस कोठडीची मागणी एसआयटीकडून केली जात आहे.

खरातने महिलांच्या लैगिंक शोषणाव्यतिरिक्त भोंदूगिरीतून कोट्यावधींची संपत्ती जमवली आहे. त्याच्या या बेनामी मालमत्ता व संपत्तीची ईडीकडूनही चौकशी सूरू आहे. दरम्यान त्याची पत्नी कल्पना खरात ही शिर्डी येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच फरार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत. ती आजूनही पोलिसांच्या हाती लागलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT