Ashok Kharat_Kalpana Kharat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat ED Action : खरात पती-पत्नीला ED चा दुसरा दणका, एकाचवेळी दोघांच्याही आर्थिक नाड्या आवळल्या...

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातने कोट्यावधींची बेकायदेशीर माया जमवली आहे. त्याचे सर्व व्यवहार आता ईडीच्या रडावर आहेत. ईडीने त्याची व त्याच्या पत्नीची पूर्णपणे आर्थिक नाकेबंदी केली आहे.

Ganesh Sonawane

Nashik crime news : भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यासंदर्भात एसआयटीचे पथक तपास करत आहे. तर दुसरीकडे त्याने जमावलेली बेकायदेशीर मालमत्ता व संशयास्पद बँक खात्यांमधील कोट्यवधींचे व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत.

भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीने आता दुसरी मोठी कारवाई केली आहे. अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना खरात दोघांच्याही आर्थिक नाड्या ईडीने आवळल्या आहेत. भोंदू अशोक खरातचे तीन तसेच त्याची पत्नी कल्पना खरातचे एक बॅंक खाते ईडीने सील केले आहे. या बँक खात्यांमधील गेल्या तीन वर्षांपासूनच्या व्यवहारांची ईडीने तपासणी केली असून नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगर जिल्ह्यातील काही खात्यांवरून खरातच्या खात्यावर कोट्यवधी रुपये वर्ग झाल्याचे समोर आले आहे.

ईडीने खेरातविरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत पहिला दणका दिला होता. आता बॅंक खाती सील करत दुसरा दणका दिला आहे. यातून खरात पती-पत्नीची आर्थिक नाकेबंदीच ईडीने केली आहे. त्यामुळे खरातच्या संशयास्पद मालमत्तांवर आता टाच येणार आहे. ईडीने खरातच्या मालमत्तांची चौकशी करण्यावर फोकस केला आहे. त्याच्या मुलाच्या बॅंक खात्यांची चौकशी देखील ईडीने केली आहे.

एसआयटी पथकाने खरातने उभारलेले मीरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर व तेथील फार्महाऊसची कागदपत्रे ईडीकडे दिली आहे. खरातने दोन बँक खात्यांना पत्नी कल्पनाचे नाव नॉमिनी म्हणून लावले असल्याचे समोर आले आहे. याशिवाय खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशीत अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खरातचे वेगवेगळे थक्क करणारे कारनामे आजवर तपासातून उघड झाले आहे. त्यापैकीच एक म्हणजे खरातकडे येणाऱ्या हायप्रोफाईल भक्तांना त्यांने गंडवले होते. ईडी किंवा आयकर विभागाची धाड पडेल असं सांगून तो माझ्याकडे पैसे ठेवायला द्या किंवा माझ्यासोबत जमीन खरेदीत गुंतवणुक करा असे सांगत असे. आता आयकर किंवा ईडीचे बोगस अधिकारी पाठवून बोगस धाड टाकून खरात आपल्या श्रीमंत भक्तांकडून पैसे उकळत असल्याचा देखील संशय तपास यंत्रणांना आहे. तसे काही प्राथमिक पुरावे देखील तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT