Ashok Kharat Rape Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Rape Case: अशोक खरातची कोर्टात ऑनलाईन हजेरी; बलात्काराच्या तिसऱ्या गुन्हात अटक होणार!

Ashok Kharat may be arrested again : अशोक खरातची ऑनलाईन कोर्टात हजेरी झाली असून तिसऱ्या बलात्कार प्रकरणात अटकेची शक्यता वाढली आहे. ताज्या घडामोडी आणि सविस्तर माहिती जाणून घ्या.

Sampat Devgire

Ashok Kharat SIT News : भोंदू तांत्रिक कॅप्टन अशोक खरात यांच्या मागे खटल्यांचा ससेमीरा लागला आहे. त्यामुळे आता त्याचे कारागृहातून बाहेर पडणे अवघड होण्याची चिन्हे आहेत. आता आणखी काही दिवस त्याचा मुक्काम पोलीस कोठडीत असेल. भोंदू तांत्रिक कॅप्टन खरात याची पोलीस कोठडीची मुदत आज संपुष्टात आली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्याला ऑनलाईन न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्याला 24 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

न्यायालयीन कोठडी सुनावली असली तरी त्याच्या जामीन्याचा मार्ग मात्र खडतर आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) खरात याच्या विरोधात दाखल तिसऱ्या बलात्काराच्या खटल्यात अटकेची परवानगी मागितली. न्यायालयाने तो अर्ज आज मंजूर केला. या प्रकरणातील सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरात याच्या अटकेसाठी न्यायालयाची परवानगी मागितली होती. त्यांचा हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्यामुळे बंदूक कॅप्टन खरात या चाटकेची प्रक्रिया उद्या पूर्ण होईल.

भोंदू कॅप्टन खरात याच्या विरोधात ११ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये विविध महिलांनी दाखल केलेल्या बलात्कार आणि फसवणुकीचे आठ गुन्हे आहेत. नाशिकला दोन फसवणुकीचे गुन्हे आहेत. शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा एक गुन्हा आहे.

कॅप्टन खरात यांनी फसवणूक आणि जादूटोणा या माध्यमातून महिलांचे शोषण आणि आर्थिक लूट केली. त्यातून मोठे साम्राज्य उभे केले. कुटुंबीयांच्या नावे शेकडो कोटींची मालमत्ता खरेदी केली. त्याचा स्वतंत्र तपास अन्य यंत्रणांकडून होणार आहे.

आज ऑनलाईन न्यायालयात हजेरी देणाऱ्या खरात याच्यासोबत कुटुंबीयांपैकी कोणीही नाही. पत्नी आणि मुलगा यापूर्वीच फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खरात याच्याबाबत पोलिसांकडून तपासात सहकार्य नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे तिसऱ्या खटल्यात त्याच्या अटकेची परवानगी प्राप्त झाली आहे. याशिवाय पाच गुन्हे प्रलंबित असल्याने खरात याच्या कारागृहातून बाहेर येण्याच्या शक्यता कमी झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT