Ahilyanagar News : महायुती आणि महाविकास आघाडीचे राजकारणामुळे महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय होईल, याचा नेम नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील राखीव श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात याचाच प्रत्यय येत आहे. काँग्रेसने तिकीट कापलेले आमदार लहू कानडे यांना महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.
अवघ्या 24 तासात झालेल्या या घडामोडीमुळे श्रीरामपूर मतदारसंघातील निवडणूक आता वेगळ्या वळणावर पोचली आहे. सहाजिक राजकीय उलथापालथीमागे स्थानिक संस्थानिक नेत्यांनी पडद्यामागे केलेल्या राजकीय घडामोडींचे मोठी खेळी आहे, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे ही जागा महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असताना ही जागा अजित पवार यांना मिळाली आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. तिथं विद्यमान आमदार काँग्रेस (Congress) होता. आमदार लहू कानडे यांचे काँग्रेसने तिकीट कापले. त्यांच्याऐवजी युवा नेते हेमंत ओगले यांना तिकीट देण्यात आले. तेव्हापासून आमदार लहू कानडे चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी मुंबईत तळ ठोकून महायुतीकडे चाचपणी सुरू केली. या चाचपणीला स्थानिक संस्थानिक नेत्यांचे देखील बळ मिळत गेले. त्यामुळे आमदार कानडे महायुतीच्या गळाला लागले.
महायुतीत ही जागा पारंपारिकपद्धतीने शिवसेनेकडे होती. शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यामुळे शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता होती. ती टाळण्यासाठी ही जागा शिवसेनेने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली. आता आमदार लहू कानडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर श्रीरामपूर मतदारसंघातून निवडणुकीला समोरे जाणार आहे. काँग्रेसने आमदार कानडे यांचे तिकीट कापले खरे, पण यामुळे दोघांना लाॅटरी लागल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एक जागा वाढली आहे. शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला आहे.
आमदार कानडे यांनी अवघ्या 24 तासात महायुतीकडून उमेदवारी मिळवल्याने, श्रीरामपूरमधील राजकीय लढतीची चर्चा राज्यपातळीवर पोचली आहे. आमदार कानडे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळताच, त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघात जागोजागी फटाके फोडून जल्लोष केला. तसंच आमदार कानडे यांनी दुपारी मेळाव्याचे आयोजन करत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यानंतर लगेचच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी निश्चित झाल्याने आता मतदारसंघात आमदार लहू कानडे आणि काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांच्यात 'सामना' रंगणार आहे.
आमदार कानडे यांनी महायुतीकडून अवघ्या 24 तासात उमेदवारी मिळवल्याने, त्यांच्या उमेदवारीला बळ कोणाचे, अशी चर्चा रंगली आहे. तसंच हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. अचानक अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एन्ट्री घेतल्याने आणि त्यांच्या पक्षाला जागा गेल्याने महायुतीने श्रीरामपुरात खेळलेल्या नवीन राजकीय ट्विस्टची चर्चा रंगली आहे. या सर्व घडामोडीमागे श्रीरामपुरातील स्थानिक राजकीय संस्थानिकांनी पडद्यामागे राहून खेळलेले राजकारण आहे, अशी चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.