Fadnavis Gets Emotional Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Fadnavis Gets Emotional: 'त्या' क्षणाने फडणवीसांच्याही डोळ्यांत पाणी आलं..

Jalgaon News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जळगाव दौऱ्यातील क्षण ट्विटरवर शेअर केला आहे

सरकारनामा ब्यूरो

Fadnavis Gets Emotional : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (28 जून ) जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जळगावमधील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या दीपस्तंभ फाऊंडेशनच्या ‘मनोबल’ संस्थेला भेट दिली. या संस्थेतील भेटीचा एक भावनिक प्रसंग फडणवीसांनी आपल्या ट्विटरला शेअर केला आहे.

दिव्यांग शाळेला भेट दिली असता शाळेतील एका दिव्यांग मुलीनं फडणवीस (Devendra Fadanvis) यांना पायानं टिळा लावला. पायानं ताट धरत त्यांचं औक्षणही केलं. मनोबल संस्थेतील हाच क्षण फडणवीसांनी भावूक शब्दात ट्विट केला आहे.

"आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की "तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे." ते पाहून मी इतकंच म्हणालो, "ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." असं ट्विट फडणवीसांनी केलं आहे. (Maharashtra Politics)

''या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले - "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" अशा कवी कुसूमाग्रांच्या कवितेच्या ओळीही फडणवीसांनी शेअर केल्या आहेत. (Devendra Fadanvis Jalgaon Visit)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT