Naseem khan
Naseem khan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

UP Election : ATS हिंदू विरोधी आहे का?; काँग्रेस नेत्याने केला सवाल

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : एनआयए (NIA) ही केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या (Central Government) इशाऱ्यावर मालेगाव केस कमकुवत करू पहात असल्याचे दिसत आहे. एटीएस (ATS) व राज्य सरकारची प्रतिमा मलिन करुन त्याचा फायदा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत (UP Election-2022) व्हावा यासाठी एटीएस हिंदू विरोधी (Against Hindu) असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींना कडक शासन होणे गरजेचे असल्याने या केसची निष्पक्ष सुनावणी व्हावी यासाठी सुनावणीवेळी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित असणे गरजेचे आहे, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान (Naseem khan) यांनी केली आहे. खान यांनी आज (ता.13 जानेवारी) एटीएस प्रमुखांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले.

दिलेल्या निवेदनात खान म्हणाले, तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे (Hement Karkare) यांनी २००८ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करून प्रज्ञा ठाकूर, (Pradnya Thakhur) कर्नल पुरोहित (Karnal Purohit) यांच्यासह अनेकांना अटक केली. हे प्रकरण एनआयएकडे दिल्यानंतर ठाकूर यांच्यावरील मकोका हटवण्यात आला व त्यांची निर्दोष सुटका व्हावी यासाठी खटाटोप सुरु केली आहे. या प्रकरणात २२३ साक्षीदार असून त्यातील १६ जणांनी साक्ष फिरवली आहे तर, १०० साक्षीदारांच्या साक्षी अजून नोंदवल्या गेलेल्या नाहीत. या साक्षीदारांना संरक्षण देणे गरजेचे आहे. आरोपींच्या दबावाखाली येत साक्षीदार साक्ष फिरवत असल्याचे दिसत असून उत्तर प्रदेश निवडणुकीत याचा फायदा व्हावा यासाठी राज्य सरकार व एटीएसची प्रतिमा खराब करण्याचे काम केले जात आहे.

आरोपींना दिलासा मिळालेल्या कोणत्याच निर्णयाला एनआयएने उच्च न्यायालयात (High Court) आव्हान दिलेले नाही. यातून एनआयएची भूमिका संशयास्पद वाटते. एनआयएच्या विनंतीनंतरही एनआयए कोर्टाने ठाकूर यांना मुक्त केले नाही व खटला चालूच ठेवला आहे हे विशेष. आतापर्यत २२३ साक्षीदार तपासले गेले त्यातील १६ साक्षीदार उलटले. एटीएसने साक्षीसाठी छळ केल्याचे काही साक्षीदारांनी म्हटले आहे. हे साक्षीदार राज्य सरकार व एटीएसची प्रतिमा मलीन करत आहेत. राज्य सरकार व एटीएसवरील जनतेचा विश्वास कायम रहावा यासाठी या प्रकरणात जे चौकशी अधिकारी होते त्यातील अधिकारी या केसच्या सुनावणीवेळी प्रत्येक सुनावणीसाठी कोर्टात पाठवावा, अशीही मागणी खान यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT