Ajit Pawar CM post Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar CM post : राष्ट्रवादीअंतर्गत कटकारस्थान, अजित पवारांची एकदा नव्हे दोनदा..; माजी मंत्री पाचपुतेंच्या दाव्यानं खळबळ

Ajit Pawar Missed CM Post Twice? Babanrao Pachpute Big Claim on NCP Politics : अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची संधी कशी हुकली यावर भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी खळबळजनक दावा केला आहे.

Pradeep Pendhare

NCP controversy : भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी, अजित पवार यांचे एकदा नव्हे, तर दोनदा मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्याचा दावा केला आहे. ही संधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे हुकल्याचेही पाचपुते यांनी म्हटले.

बबनराव पाचपुते हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या काळात मंत्री राहिले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.

भाजपचे बबनराव पाचपुते म्हणाले, "अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्री होण्याची एकदा नव्हे, दोनवेळा स्पष्ट संधी होती आणि त्याचा सर्वांत जवळचा साक्षीदार मी स्वतः आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असताना, पहिल्यावेळी पक्षाच्या 62 आमदारांपैकी 57आमदारांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करावे, असे लेखी समर्थनपत्रे दिली होती. मात्र, नेत्यातील पक्षातील काही नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली."

दुसरी संधी कशी हुकली, यावर बोलताना भाजपचे बबनराव पाचपुते म्हणाले, "विधानसभेत दुसऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे 72 आमदार निवडून आले होते, तर काँग्रेसचे (Congress) 69 आमदार होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार अन् अजितदादा मु्ख्यमंत्री होणार, अशी चर्चा होती." पण या वेळी देखील पक्षातील काही नेत्यांच्या विरोधामुळे अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची शपथ हुकली.

'अजितदादांना मुख्यमंत्रीपदावर संधी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी पक्षात आपण स्वतः खूप आग्रह धरला. परिणामी माझा देखील पक्षातून पत्ता कट करण्यात आला. अशी प्रकारे एकदा नव्हे, तर दोनदा अजितदादांची मुख्यमंत्रीपदावर संधी हुकली,' असा दावा देखील बबनराव पाचपुते यांनी केला.

बबनराव पाचपुते यांनी अजित पवार यांच्याबरोबर काम केलं आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना पाचपुते म्हणाले, "अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झालं आहे. जनतेच्या मनात असून, न झालेले मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची ओळख आता सर्वांमध्ये कायम राहणार आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT