Bachchu Kadu, Pankaja Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bachchu Kadu On BJP : बच्चू कडूंचा भाजपवर 'बाँब'; म्हणाले, "पंकजा मुंडेसोबत युती करण्यास तयार..."

Sunil Balasaheb Dhumal

Nashik Political News : भाजपमध्ये माजी मंत्री, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. यातच मंत्रिपद मिळाले नसल्याने युतीतील आमदार बच्चू कडूंनी जाहीरपणे सरकारला इशारे दिले आहेत. आता कडुंनी महायुतीत नवा बाँब टाकला आहे. युतीत सन्मान मिळाला नाही तर पंकजा मुंडे यांच्यासोबत युती करण्यास तयार असल्याचे कडू म्हणाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. (Latest Political News)

'आमचा मंत्रिमंडळात समावेश करून घेण्याची वेळ असताना शिंदे-फडणवीसांनी अजित पवारांना सामावून घेतले', असे म्हणत बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे. तसेच पंकजा मुंडेंनेही राज्य भाजपकडून डावलण्यात येत असल्याचे जाहीरपणे बोलून दाखवले. दोघेही राज्यातील भाजप नेत्यांच्या कृतीवर नाराज असल्याचे दिसून आले आहे. याच धर्तीवर कडू यांनी पंकजा मुंडेंचे कौतुक करत त्यांच्यासोबत जाण्याची भाषा केली आहे.

निवडणुकीत सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वतंत्रपणे लढण्याचाही इशाराही कडू यांनी यापूर्वी दिला आहे. आता त्यांनी थेट मुंडे यांच्यासोबत जाण्याचे वक्तव्य केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

बच्चू कडू म्हणाले, "पंकजा मुंडेंमध्ये (Pankaja Munde) क्षमता आहेत, यात मला काही शंका नाही. त्यांनीही आपल्या क्षमता तपासून पाहव्यात. त्यांनी मनावर घेतले, तर त्या करूही शकतात. स्वतःचे दहा पंधरा आमदार असतील, तर मग आम्हीही पंकजा मुंडे यांच्यासोबत युती करू."

"युती करताना लोक जमा केली, पण लोकांचे कामेही करावे लागतात. या पाच वर्षात जे पक्षांतर झाले, ते मागच्या पन्नास वर्षात झालं नाही", असा टोलाही कडू यांनी शिंदे-फडणवीसांना लगावला आहे.

मराठा आरक्षणावरूनही कडू यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची मागणीही कडूंनी केली. 'मराठा हे कुणबी आहे, हे सूर्याइतके सत्य आहे' असे विधान यावेळी कडूंनी केले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचाही कडू यांनी समाचार घेतला आहे. 'या अगोदर तीन विरोधी पक्षनेते सत्तेत गेले आहेत. आता विजय भाऊ यांची काय गॅरंटी आहे ?' असा टोला कडू यांनी लगावला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT