Crime News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Yevla Crime News : येवल्यात मागासवर्गीय युवकास अपहरण करून मारहाण; घटनेची फडणवीसांकडून गंभीर दखल!

Sampat Devgire

Yevla Police News : येवल्यात कौटुंबिक वादातून रविवारी एका मागासवर्गीय युवकास निर्वस्त्र करून मारहाण झाली. एवढच नाहीतर त्याच्या कुटुंबीयांनाही दमदाटी केली गेली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

प्राप्त माहितीनुसार, येवला तालुक्यातील एका खेड्यात हा प्रकार घडला. स्थानिक वादातून ही घटना घडल्याचे बोलले जाते. एका युवकाला फोन करून बाजारपेठेत बोलविण्यात आले. त्यानंतर त्याचे अपहरण करण्यात आले.

अपहरणानंतर त्या युवकाला एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. पाच ते सहा जणांनी त्या ठिकाणी जाऊन संबंधित युवकाला शिवीगाळ केली. यावेळी त्याला कपडे काढायला भाग पाडण्यात आले आणि त्यानंतर चार ते पाच जणांनी पट्ट्याने व काठीने मारहाण केली. एवढच नाहीतर मारहाण करण्यात आलेल्या युवकाच्या आईला व अन्य सदस्यांना दमदाटी करण्यात आली.

या घटनेनंतर पीडित युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र गुन्हा दाखल करण्यात आला नाही. शिवाय या घटनेचे व्हिडिओ चित्रण देखील करण्यात आले. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. यासंदर्भात पोलिसांकडून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र सोमवारी पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली.

समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते अमित गोरखे यांनी याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devevndra Fadnavis) यांची भेट घेतली. या प्रकाराची माहिती त्यांनी दिल्यानंतर फडणवीस यांनी त्याची गंभीर दखल घेतली. तातडीने गृह विभागाला सूचना देण्यात आल्या.

स्थानिक पोलिसांनाही याबाबत कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानंतर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. आता या संदर्भात ॲट्रॉसिटीसह अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मारहाण करणारे युवक फरार झाले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक देखील रवाना करण्यात आले.

भाजप(BJP) नेते अमित गोरखे यांनी मारहाण झालेल्या युवकाशी संपर्क केला. दूरध्वनीवरून त्याला धीर दिला. याबाबत पोलीस तातडीने कारवाई करणार आहेत. प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. भारतीय जनता पक्ष पीडितांच्या पाठीशी उभा आहे, असे आश्वासन यावेळी गोरखे यांनी दिले.

दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघातील हा प्रकार आहे. रविवारी सकाळी मंत्री भुजबळ यांनीही या संदर्भात प्रशासनाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. भुजबळ यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे कळविले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT