Girl Student atrocity Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Badlapur Politics: राज्यात अत्याचार थांबेना, १२ वर्षीय विद्यार्थीनीवर मुख्याध्यापकाकडूनच अत्याचार!

Badlapur incident repeated, principal's torture of twelve-year-old girl in Nashik too-टाकेद (इगतपुरी) येथील खाजगी शाळेत बारा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराने खळबळ,गावात कडकडीत बंद.

Sampat Devgire

Minor Girl atrocity in Nashik-सबंध महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर घटनेची पुनरावृत्ती नाशिक येथे झाली आहे. टाकेद (इगतपुरी) येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांनी दखल घेत कारवाई केली.

या संदर्भात माहिती मिळताच गावामध्ये संताप उसळला ग्रामस्थांनी गाव बंद करून शाळेवर ठिय्या आंदोलन केले संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेनंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली.

यासंदर्भात टाकेद (इगतपुरी) येथील एका खाजगी शाळेत हा प्रकार घडला. सहावीत शिकणाऱ्या बारा वर्षीय मुलीला मुख्याध्यापकाने घरी बोलावले होते. संबंधित विद्यार्थिनी घरी गेल्यावर तिला पाण्यातून गुंगीचे औषध देण्यात आले. संबंधित मुलीला गुंगी आल्यावर तीच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर विद्यार्थ्यीनीला त्रास होऊ लागल्याने तीने हा प्रकार विद्यार्थीनीने तिच्या आजीला सांगितले. त्यांनी तातडीने घोटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या संदर्भात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित मुख्याध्यापक आणि त्याला मदत करणाऱ्या एका शिक्षकाला ताब्यात घेतले.

यासंदर्भात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली. काही संस्था चालकांनी त्यांच्याकडे संपर्क केल्याचे कळते. त्याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकाला तातडीने बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.

बदलापूर येथील घटना चर्चेत असतानाच हा प्रकार घडला बदलापूरच्या घटनेने सबंध महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतरही शालेय स्तरावर विद्यार्थिनीवर अत्याचार झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये संस्थेचे कर्मचारी सहभागी असल्याने ते अधिक धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या प्रकरणानंतर गावात अद्यापही तणावाचे वातावरण आहे.ग्रामस्थांनी शाळेच्या आवारात गर्दी केली होती. पोलिसांनी वारंवार त्यांना शांतेतेचे आव्हान केले. संबंधित अत्याचार पीडित मुलीला मुख्याध्यापकाने धमकी दिली होती. या मुलीच्या घरी तिची आजी आणि ती अशा दोघीच राहतात. त्यामुळे त्या दोघीही झालेल्या प्रकाराने अत्यंत दास्तावलेल्या आहेत.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT