Raksha Khadse
Raksha Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raksha Khadse: बोदवड सिंचन योजनेला मिळणार ५३६ कोटी

Sampat Devgire

मुक्ताईनगर : नवी दिल्ली (New Delhi) येथे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे (Centre Water & Power Ministry) सचिव, केंद्र जल आयोग अध्यक्ष, नीती आयोग प्रतिनिधी व जलसंपदा मंत्रालय सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या केंद्र शासनाच्या छाननी समितीच्या तिसऱ्या बैठकीत तापी (Tapi) पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा एकचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेंतर्गत वेगवर्धित सिंचन योजनेत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (Centre approved Bodwad irrigation scheme after Raksha Khadse`s effort)

याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे मागणी केली होती, तसेच केंद्रात सुद्धा याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

या योजनेचा टप्पा एकची एकूण किंमत रुपये २१४१.१९ कोटी असून कामाप्रित्यर्थ किंमत रुपये १९२३.८१ कोटी एवढी आहे. केंद्र सरकारतर्फे मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार या कामाची उर्वरित किंमत १०७९.९९ कोटी असून, त्यापैकी ५३६ कोटी ६४ लाख येत्या तीन वर्षात केंद्र शासनामार्फत प्राप्त होणार आहेत. उर्वरित ५४३.३५ कोटी राज्य शासन देणार आहे. बोदवड परिसर सिंचन योजनेचा प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेंतर्गत वेगवर्धित सिंचन योजनेत समावेश झाल्याने या टप्प्यांतर्गत विदर्भातील ६१६७ हेक्टर व अवर्षण प्रणव भागातील ९५०७ हेक्टर तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील ६५४६ हेक्टर अशी बुलडाणा जिल्ह्यातील १३,७४३ हेक्टर व जळगाव जिल्ह्यातील ८,४७७ हेक्टर अशी एकूण २२,२२० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा फायदा मिळणार आहे.

या योजनेचा केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेंतर्गत वेगवर्धित सिंचन योजनेत समावेश होणेसाठी खासदार रक्षा खडसे यांनी याबाबत वेळोवेळी निरंतर पाठपुरावा केला होता.

नवी दिल्ली येथील केंद्र शासनाच्या छाननी समितीच्या तिसऱ्या बैठकीत यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे सचिव, केंद्रीय जल आयोग अध्यक्ष, नीती आयोग प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्रालय सचिव श्री. राजपूत, श्री. कपाले, तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक श्री. मांदाडे, मुख्य अभियंता श्री. बोरकर, अधीक्षक अभियंता श्री.भदाणे, कार्यकारी अभियंता श्री. गोकुळ महाजन आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT