Varkari community with Collector Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Varkari Community News: बागेश्वर बाबा हा तर अज्ञानी बाबा!

संत निवृत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्तांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) गेले काही दिवस महाराष्ट्रातील (Maharashtra) संत, महापुरूषांविषयी वादग्रस्त विधाने करण्याची स्पर्धाच लागली आहे. हे अत्यंत बेजबाबदार आहे. वीरेंद्र उर्फ बागेश्वर महाराज (Bagheshwar Maharaj) या तथाकथीत बाबाने संत तुकाराम (Sant Tukaram Maharaj) यांच्याविषयी असेच अज्ञानमुलक विधान केले आहे. त्याच्यावर अत्यंत गंभीर कारवाई करावी, अशी मागणी येथील वारकरी संप्रदायातर्फे (Varkari) करण्यात आली आहे. (Varkari association given memorandam to Collector for Action)

यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार होते. मात्र निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने पोलिसांनी त्यास परवानगी नाकारली. पोलिसांच्या या भूमिकेविषयी वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे वीरेंद्र उर्फ बागेश्वर महाराज यांच्या कथित वक्तव्याचा निषेध म्हणून येथील संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान त्रंबकेश्वर व वारकरी सेवा समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी गंगाधरण यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, धीरेंद्र उर्फ बागेश्वर या बाबाने संत तुकाराम महाराज यांच्या पत्नी त्यांना रोज मारझोड करत असे व म्हणून ते घर सोडून गेले असे आक्षेपार्य विधान करून वारकरी संप्रदायात खळबळ माजवून दिली. त्यांचे हे विधान पूर्णतः अज्ञानमूलक आहे. त्यांना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि परंपरेविषयी काहीच माहिती नाही, हे यावरून स्पष्ट होते.

नाशिक हे वारकऱ्यांचे केंद्रस्थान आहे. संत निवृत्तीनाथांचे येथे आद्यपीठ आहे. असे असताना कोणीही उठून संतांवर टीका करावी हे शोभनीय नाही. त्याचा निषेध वारकरी संप्रदाय आणि संत निवृत्तीनाथ संस्थान यांनी एकत्र मिळून केला. बागेश्वर बाबांवर कारवाई करावी, तसेच त्यांनी जाहीर माफी मागावी असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना निवृत्तीनाथ संस्थांचे अध्यक्ष निलेश गाढवे- पाटील, सचिव अॅड. सोमनाथ घोटेकर, विश्वस्त अमर ठोंबरे, पुंडलिकराव थेटे, माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील, संपत धोंगडे, अरुण दोंदे, डॉ. भरत नागरे, डॉ. रामदास भोंग, अब्दुल बाबा आदी यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT