Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat: बाळासाहेब थोरात यांचा भाजपला इशारा, लोक दगड हातात घेतील, अशी वेळ येऊ देऊ नका!

Balasaheb Thorat; BJP's strike rate in assembly elections is 90 percent this has never happened before -विधानसभा निवडणुकीत भाजपचे नव्वद टक्के उमेदवार विजय झाले तरी कसे?

Sampat Devgire

Balasaheb Thorat News: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरी बाबत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. याबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. हा पक्ष धर्माचे नाव घेऊन काहीही खपवतो, असे ते म्हणाले.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. या आरोपांमुळे देशभर खळबळ उडाली आहे. यारोपांना आता अन्य विरोधी पक्षांनीही पाठिंबा देण्यास सुरुवात केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी भाजपला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. भाजपने महाराष्ट्राच्या निवडणुकीत १४९ उमेदवार दिले. यातील १३२ उमेदवार विजयी झाले. हे प्रमाण नव्वद टक्के आहे. असा स्ट्राईक रेट इतिहासात कधीच पाहायला मिळाला नाही. एवढा स्ट्राईक रेट कधी असतो का? असा प्रश्न त्यांनी केला.

गेल्या चाळीस चाळीस वर्षात मी आठ वेळा आमदार झालो. मात्र निवडणुकीत अशी परिस्थिती कधीही बघितली नाही. सध्या धर्माच्या नावाखाली राजकारण सुरू आहे. धर्माचे नाव घेऊन काहीही खपवतो आहे. तुमचे नाव घेतले की काहीही जमते असं त्यांचं ग्रह होऊ लागला आहे. मात्र लोकांना दगड हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा त्यांनी दिला.

नाशिकमध्ये राज्यभरातील आदिवासी शिक्षक बिऱ्हाड मोर्चा घेऊन आदिवासी विकास भवन समोर या देऊन बसले आहे. मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांनी या आंदोलकांची भेट घेतली. मात्र गेल्या दीड महिन्यांपासून कोणताही तोडगा निघालेला नाही. हा आदिवासी शिक्षणाचा खेळखंडोबा करण्याचाच प्रकार आहे.

गेल्या दहा वर्षांपासून हे शिक्षक राज्यभरातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये काम करीत होते. अचानक सरकारला गुणवत्तेची आठवण झाली आहे. यामध्ये कंत्राटी कामगार नेमून 84 कोटींचा घपला करण्याचे काम सुरू आहे. सध्या सर्व राजकारण पैशाच्या जोरावर सुरू असल्याने आदिवासींना न्याय मिळत नाही.

यावेळी माजी मंत्री थोरात यांचे खासदार डॉ शोभा बच्छाव, राजाराम पानगव्हाणे, आकाश छाजेड, लकी जाधव आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. आदिवासींच्या या प्रश्नांवर लोकसभेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करीन असे खासदार बच्छाव यांनी सांगितले. आदिवासी शिक्षकांच्या या प्रश्नावर राज्य शासनाने आंदोलकांचा अंत पाहू नये. तातडीने निर्णय घेऊन दिलासा द्यावा. अन्यथा काँग्रेस पक्ष या आंदोलनात सहभागी होईल असा इशारा त्यांनी दिला.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT