Girija Pichad joins Congress Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girija Pichad joins Congress : अकोले तालुक्यात काकांना पुतणीचा राजकीय धक्का; भाजपऐवजी काँग्रेसचं दार ठोठावलं

Girija Pichad, Niece of Vaibhav Pichad, Joins Congress in Mumbai Balasaheb Thorat & Harshwardhan Sapkal Present : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनिमित्ताने अहिल्यानगर अकोल इथं मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.

Pradeep Pendhare

Congress joining event Mumbai : भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांची पुतणी गिरिजा पिचड यांनी काँग्रेसचे दार ठोठावलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थित त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

गिरिजा पिचड या दिवंगत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची नात आहे. गिरिजा पिचड यांच्या या निर्णयाने वैभव पिचड यांना धक्का असल्याचं मानलं जात आहे.

भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात 'ऑपरेशन लोटस' सुरू केलं आहे. राष्ट्रवादी काँगेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाला या ऑपरेशनद्वारे लक्ष्य करण्यात आलं आहे. काँग्रेस पक्ष संपलेला आहे. संपलेल्या पक्षातील पदाधिकारी त्यांच्याकडेच बरं, आम्हाला त्यांची गरज नाही, अशी भूमिका मंत्री विखे पाटील यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मांडली होती.

परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, विशेष करून, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने (Congress) डावपेच टाकायला सुरूवात केली आहे. भाजप मंत्री विखे पाटील यांनी अकोल्यातल्या नेत्या सुनीता भांगरे यांचा भाजपप्रवेश घडवून आणला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मात्र भाजपमधील माजी आमदार वैभव पिचड यांच्या पुतणी गिरिजा पिचड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने आगामी राजकीय गणितं बदलणार असल्याची चर्चा आहे.

गिरिजा पिचड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असला, तरी त्यांनी पुढची राजकीय भूमिका सांगितलेली नाही. ती लवकरच स्पष्ट होईल, असे सांगितले जाते. अकोले तालुक्यात काँग्रेसची ताकद नाही. परंतु, अकोले तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांबरोबरच संगमनेरच्या पठार भागातील गटही अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित आहे. निवडणूक लढवली, तर त्याच गटातून लढवतील, अशी चर्चा आहे.

काँग्रेस प्रवेशापूर्वी पडद्यामागील हालचाली

काँग्रेस प्रवेशापूर्वी गिरिजा पिचड यांच्याबाबत बऱ्याच राजकीय हालचाली पडद्यामागे झाल्या. गिरिजा पिचड यांनी संगमनेर इथं बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. आगामी निवडणुकीपूर्वी ही भेट अनेक चर्चांना उधाण देऊन गेली. मात्र ही भेट सदिच्छा असल्याचे सांगितले गेले.

गिरिजांचा मुंबईत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

पण गिरिजा पिचड यांनी थेट मुंबईत बाळासाहेब थोरात आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थित काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गिरिजा पिचड यांचा हा पक्ष प्रवेश म्हणजे, त्यांचे काका माजी आमदार वैभव पिचड यांना धक्का मानला जात आहे. गिरिजा ही दिवंगत मधुकरराव पिचड यांचे ज्येष्ठ चिरंजीव हेमंत यांची कन्या तसेच माजी आमदार वैभव पिचड यांची पुतणी आहे. गिरिजा या मुंबईत राहत असल्यामुळे त्यांचा अकोल्याशी विशेष संपर्क नाही.

वैभव पिचडांच्या प्रचारात गिरिजाचा सक्रिय सहभाग

वैभव पिचड अकोल्यातून आमदारकी लढवत असताना, त्यांच्या प्रचारात गिरिजा पिचड या सक्रिय होत्या. विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. जिल्ह्यातील या सर्वांसाठी राखीव असणाऱ्या सात पैकी पाच जागा अकोले तालुक्यातील आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT