Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat : थोरात विरोधकांवर कडाडले; म्हणाले, 'मीही हिंदू, जातीचे विषारी...'

Balasaheb Thorat Ahilyanagar Congress politics Sangamner assembly election results : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पराभवानंतर घेतलेल्या मेळाव्यातून विरोधकांवर टीका करताच जातीच्या विषारी राजकारणावरून इशारा दिला आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात विधानसभा निवडणुकीत त्यांचे होमग्राऊंड संगमनेरमध्ये पराभवानंतर पहिल्यादांच जाहिररीत्या विरोधकांवर कडाडले.

"मीही हिंदू आहे. परंतु कधीही जाती-धर्माचे विषारी राजकारण केले नाही. संगमनेर तालुक्यात विकासाच्या राजकारणाची संस्कृती आहे. सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श पॅटर्न निर्माण केला. एखाद्या पराभवाने खचून जाणारा नाही. ज्यांनी कोणी तालुक्यात येऊन विष पेरण्याचा प्रयत्न केला आहे. हा हल्ला परतवून लावणारच", असा ठाम निर्धार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात उत्साह संचारणारे भाषण यावेळी केले. भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला. मी स्वातंत्रसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे. नव्याने उभारी घेणार आहोत. आता आपले आमदार सत्यजित तांबे आहे. त्यांच्या माध्यमातून काम मार्गी लावू, असे सांगून सत्यजित तांबे यांना काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय करण्याचे संकेत यावेळी बाळासाहेब थोरात यांनी दिले.

संगमनेर तालुक्याचा विकासाची वाटचाल कायम ठेवण्यासाठी आपण संघटनात्मकदृष्ट्या कार्यरतच राहणार आहोत. हिंदू-मुस्लिम द्वेष पसरून काहींनी राजकारण केले. मीही देखील हिंदू आहे. पण सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले. दुष्काळी संगमनेरची ओळख बदलली आहे. विकासात्मक राजकारणाचा पॅटर्न राज्यात संगमनेरने दिला आहे. संगमनेर 1985 पूर्वी दंगलीचे शहर म्हणून ओळखले जायचे. ही ओळख सर्वांना बरोबर घेऊन काम केल्याने मोठ्या कष्टाने पुसल्याची आठवण काँग्रेसचे (Congress) बाळासाहेब थोरातांनी करून दिली.

शिर्डीत जाण्याचे कारण की...

विरोधकांनी काही खोट्या एजन्सी तयार करून खोटे व्हिडिओ टाकून बदनामी केली. आता हेच षडयंत्र करणाऱ्यांना उघडे पाडणार असल्याचा इशारा थोरातांनी दिला. सत्तेचा गैरवापर करून राहाता तालुक्यात अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस केल्या गेल्या होत्या. हे सर्व थांबवण्यासाठी आपण शिर्डी मतदारसंघात जाऊन लढा दिल्याचे थोरातांनी सांगितले.

सुधीर तांबेंनी डागली तोफ

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विरोधकांच्या जाती-धर्माच्या राजकारणावर तोफ डागली. ते म्हणाले, "थोरातांनी राजकारणातील पावित्र्य जपले. जातीय तणाव निर्माण करून द्वेष भावना पसरून घाणेरडे राजकारण संगमनेरमध्ये पेरले गेले. या मंडळींनी सुसंस्कृत नेतृत्वाचा पराभव नव्हे तर घात केला".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT