Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat : संगमनेरच्या शांती मोर्चातून बाळासाहेब थोरातांची गर्जना, आता अमृतसेना तयार करावी लागणार..

Balasaheb Thorat : कीर्तनकार भंडारेंच्या धमकीनंतर संगमनेरमध्ये कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी शांती मोर्चा काढला. महाविकास आघाडीसोबत विविध संघटना मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

Ganesh Sonawane

Sangamner protest : किर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना 'आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल' अशी धमकी दिल्यानं संगमनेरमध्ये वातावरण तापलं आहे. या धमकीच्या निषेधार्थ आज (21 ऑगस्ट) संगमनेरमध्ये थोरात समर्थकांनी मोर्चा काढला. या मोर्चात बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे काही नेतेही सहभागी झाले.

या मोर्चा दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी किर्तनकार भंडारे यांनी दिलेल्या धमकीविरोधात 'आपण मरायला तयार असल्याचे म्हटलं. ते म्हणाले, मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा असून तत्त्वांसाठी, विचारासाठी माझी मरण्याची देखील तयारी आहे. मी महात्मा गांधी होऊ शकत नाही हे मला माहित आहे, पंरतु तत्त्वांसाठी मी मरायला देखील तयार आहे.

थोरात यांनी यावेळी पोलिस यंत्रणेवरही निशाणा साधला. ते म्हणाले, गुंड लोकांचा बंदोबस्त करायला पाहीजे. पण, पोलिस घरगडी असल्यासारखं वागतात. राज्यात देखील अशीच परिस्थिती आहे. यावेळी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवण त्यांनी करुन दिली. त्यासह विधिमंडळात मारामाऱ्या, मंत्र्याकडे नोटांचे बंडल दिसतात. हे सगळं झाकण्यासाठी कोकाटे यांचा बळी घेतला गेला, असा आरोप थोरातांनी केला. भुजबळांचे सुद्दा काय हाल चालले ते तुम्हाला काय सांगायचं. ते म्हणाले की, विद्यमान आमदार माझा डीएनए तपासा म्हणतो. म्हणजे थेट माझ्या आईवर बोलतो. धांदरफळ येथे देखील एकजण मुर्ख असाच बोलला होता आणि आता आमदार देखील असं बोलत आहे.

थोरात पुढे म्हणाले, शहरातील लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरीकडे या सगळ्या गोष्टी होत आहे, आपल्याला काय करायचं असं न म्हणता तुम्ही त्यावर विचार केला पाहिजे. जे विष पेरले जात आहे ते ओळखा. या सगळ्या गुंड लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला आता अमृतसेना तयार करावी लागणार आहे. गुंड लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे, असे आवाहन थोरात यांनी केले.

आम्ही लोक पाठवली असा आरोप आमच्यावर केला गेला. मात्र, घुलेवाडीमध्ये सगळे कर्मचारी राहतात ते कीर्तनासाठी गेले असतील. वारकरी संप्रदाय असल्याने स्थानिक लोक जातात. एक बाई यू ट्यूबवर आपल्याला शिव्या देते, तिला कोण पैसे पुरवतं? असा सवाल थोरातांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT