Balasaheb Thorat| Dipak pandey| Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

दिपक पांडेंच्या पत्रावर बाळासाहेब थोरात नाराज, म्हणाले, मिडीयाकडे...

Nashik news| Balasaheb Thorat| Dipak pandey| दिपक पांडे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहीत नाशिकच्या (Nashik) महसूल विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत

सरकारनामा ब्युरो

नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडे (Dipak Pandey) यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहीत नाशिकच्या (Nashik) महसूल विभागाच्या कारभाराबाबात मोठा गौप्यस्फोट केला. त्यानंतर या लेटर प्रकरणावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb-thorat) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आयुक्त दिपक पांडे यांना एखाद्या विभागाबद्दल वाटतं तर ते स्पेसिफिक मांडणी करू शकतात. पण त्यांनी मिडीयाकडे जायची गरज नव्हती. त्याच्या पत्राची भाषा आक्षेपार्ह आहे. एखादी गोष्ट चुकत असली तर अधिकाऱ्यांना शिक्षा देतो. पण कायद्याचे राज्य असताना अशी भाषा वापरणे योग्य नाही, अशी प्रतिक्रीया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. तसेच आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचेही म्हटले आहे.

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डिटोनेटर सारख्या स्फोटकांप्रमाणे आहेत. यातून एक जिवंत बॉम्ब तयार होतो आणि तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो. हेच भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य जनतेचा छळ करत पैशांसाठी त्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आपल्या पत्रातून केला. महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घेतले जावेत, अशी मागणी दीपक पांडे यांनी केली आहे. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनी या लेटरबॉम्बवर आपली भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, यावेळी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवरही भाष्य केले. नितीन गडकरी यांचे सगळ्यांशी चांगले सबंध आहेत. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे जाण्यात विशेष काय असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी केला. तसेच, अनेक आमदार प्रशिक्षण शिबीराला जातात. तिथे सर्व पक्षाचे आमदार एकमेकांना भेटत असतात, त्याला आम्ही वेगळ स्वरुप देत नाही. पण आमच्या आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे वेळ मागितली तरी त्याला वेगळ स्वरुप दिलं जात म्हणजे कोणीतरी कुठेतरी उद्योग करत आहे, असाच याचा अर्थ होतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT